नाशिक – शहरात डोळ्यांची साथ पसरून सहस्रो रुग्णांना त्याची लागण झाली आहे. मुलांमध्ये ही साथ पसरू नये; म्हणून नाशिक महापालिकेने १८ ते ३१ ऑगस्टपर्यंत म्हणजे १४ दिवस ४५० उद्याने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. प्रतिदिन येथे डोळे आलेले ३०० ते ४०० रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयात उपचार आणि पडताळणी यांसाठी येत आहेत.