मुंबईत पहिल्या भारतीय आंतरराष्ट्रीय क्रूझ परिषदेचे आयोजन !

सोनोवाल यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. भविष्यात भारताला ‘क्रूझ हब’ म्हणून ओळख निर्माण करून देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचे सोनोवाल यांनी सांगितले.

गव्हाच्या जागतिक बाजारमूल्याने गाठला विक्रमी उच्चांक !

एकूणच जागतिक स्तरावर महागाई वाढल्याने गरीब देशांत दुष्काळ आणि सामाजिक असंतोष पहावयास मिळू शकतो, असे सांगण्यात येत आहे.

अमेरिकेत चर्चमधील गोळीबारात एकाचा मृत्यू

गोळीबाराच्या वेळी चर्चमध्ये ३० ते ४० जण उपस्थित होते. यांतील बहुतेक जण तैवान वंशाचे नागरिक होते.

तमिळनाडूतील देवसहायम् पिल्लई यांना व्हॅटिकनकडून ‘संत’ घोषित

पिल्लई हे पहिले भारतीय सामान्य व्यक्ती आहेत, ज्यांना संत घोषित करण्यात आले आहे. या वेळी भारतियांच्या समुदायाने तिरंगा ध्वज फडकावत आनंदोत्सव साजरा केला.

पेशावरमध्ये २ शीख उद्योजकांची हत्या !

नेहमी पाकची तळी उचलून भारताला वेठीस धरणारे खलिस्तानवादी पाकमधील शिखांच्या वारंवार होणार्‍या हत्यांसंदर्भात मूग गिळून गप्प बसतात ! यातून अशांना शिखांविषयी किती प्रेम आहे, हे उघड होते !

नेपाळविना आमचे श्रीरामही अपूर्ण ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळच्या दौर्‍यावर गेले आहेत. त्यांनी १६ मे या दिवशी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने नेपाळमधील भगवान बुद्धांचे जन्मस्थान असेल्या लुबिंनी येथे जाऊन तेथील माया देवी मंदिरात पूजा केली.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना रक्ताचा कर्करोग झाल्याचा दावा

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना रक्ताचा कर्करोग  झाल्याचा दावा ‘न्यूज लाइन’ या नियतकालिकात एका ‘ऑडिओ टेप’मधील संभाषणाचा हवाला देत करण्यात आला.

इंधन निर्यातीवर बंधने आल्याने जर्मनीत वाहनांवर वेगमर्यादा येणार !

अधिक वेगामुळे अधिक इंधन लागत असल्याने जर्मनीत वाहनांच्या वेगावर मर्यादा आणण्याचा निर्णय तेथील विविध राज्यांच्या पर्यावरण मंत्र्यांनी एकमुखाने घेतला. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जर्मनीला तेल आणि वायू मिळण्यावर बंधने आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्र्यांनी सांगितले.

पृथ्वीच्या दिशेने प्रचंड वेगाने मार्गक्रमण करत आहे लघुग्रह !

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या वैज्ञानिकांनी दिलेल्या चेतावणीनुसार पृथ्वीच्या दिशेने एक लघुग्रह मार्गक्रमण करत आहे. हा लघुग्रह ताशी १८ सहस्र किमी एवढ्या प्रचंड वेगाने पुढे सरकत आहे.

न्यूयॉर्कमधील सुपरमार्केटमध्ये झालेल्या गोळीबारात १० जण ठार

न्यूयॉर्क येथील बफेलो भागातील जेफरसन अव्हेन्यूजवळ असलेल्या टॉप फ्रेंडली सुपरमार्केटमध्ये सशस्त्र आक्रमणकर्त्याने केलेल्या गोळीबारात १० जणांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक घायाळ झाले.