मॉस्को (रशिया) – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना रक्ताचा कर्करोग झाल्याचा दावा ‘न्यूज लाइन’ या नियतकालिकात एका ‘ऑडिओ टेप’मधील संभाषणाचा हवाला देत करण्यात आला. या ‘ऑडिओ टेप’मध्ये रशियाच्या दोन व्यापार्यांचे संभाषण आहे. यात ते म्हणत आहेत की, पुतिन यांनी हट्टापायी रशिया, युक्रेन आणि अन्य काही देशांची आर्थिक घडी पूर्णतः उद्ध्वस्त केली आहे. पुतिन यांच्यामुळे संपूर्ण जगाला अनेक समस्यांना सामारे जावे लागत आहे. त्यांच्या आजारपणामुळे ते युद्ध जिंकू शकणार नाहीत. आतापर्यंत १५ सहस्र रशियन सैनिक मारले गेले आहेत; मात्र यानंतर जरी पुतीन युद्ध जिंकले, तरी त्यांना सत्तापरिवर्तनाला सामोरे जावे लागेल.
The latest development on Putin’s rumoured terminal illness has been exacerbated by images of Putin looking frail and using a blanket https://t.co/zoNR8DxWfs
— Irish Daily Mirror (@IrishMirror) May 13, 2022