नेपाळविना आमचे श्रीरामही अपूर्ण ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदी नेपाळ दौर्‍यावर

काठमांडू (नेपाळ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळच्या दौर्‍यावर गेले आहेत. त्यांनी १६ मे या दिवशी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने नेपाळमधील भगवान बुद्धांचे जन्मस्थान असेल्या लुबिंनी येथे जाऊन तेथील माया देवी मंदिरात पूजा केली. या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आज भगवान बुद्धांच्या जन्मस्थळी येण्याचे सौभाग्य मिळाले. येथील ऊर्जा मला वेगळाच अनुभव देत आहे. जेव्हा मी नेपाळमध्ये येतो, तेव्हा पशुपतीनाथ, जनकपूरधाम अथवा लुंबिनी येथे मला हा देश त्याचे आध्यात्मिक आशीर्वाद देत असतो. नेपाळविना आमचे भगवान श्रीरामही अपूर्ण आहेत. भारतात श्रीराममंदिर बांधले जात असतांना नेपाळमध्येही तितकचा आनंद होत आहे.