मेट्रोच्या स्थानकाजवळ राजभवनावर जाणारा मोर्चा अडवला !
सहस्रोंच्या शेतकर्यांचा मोर्चा राजभवनाकडे निघाला होता. तो मेट्रो स्थानकाच्या बाहेरील चौकात अडवण्यात आला. मेट्रो चौकात दुपारी ३ ते ४ या वेळेत मोठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
सहस्रोंच्या शेतकर्यांचा मोर्चा राजभवनाकडे निघाला होता. तो मेट्रो स्थानकाच्या बाहेरील चौकात अडवण्यात आला. मेट्रो चौकात दुपारी ३ ते ४ या वेळेत मोठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
देहलीच्या सीमेवर चालू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनामध्ये गेलेले काँग्रेसचे खासदार रणवीत सिंह बिट्टू यांच्यावर आक्रमण करण्यात आले. त्यांना धक्काबुक्की करण्यात आली, तसेच त्यांची पगडी खेचण्यात आली.
प्रारंभी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य संमेलनाच्या आतापर्यंतच्या ९३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच संशोधकाची संमेलनाध्यक्षपदी निवड झाली आहे.
अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात अमली पदार्थ तस्करीचे मोठे जाळे समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (एन्.सी.बी.) पथकाने मुंबई पाठोपाठ पुण्यातील हडपसर आणि खडकवासला परिसरात धाडी टाकल्या.
शिवसेना खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रकात जाधव यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
शिधापत्रिकेला आधार कार्ड क्रमांक जोडला (लिंक) नसल्यास १ फेब्रुवारीपासून रेशन बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते आणि तहसीलदार आशा होळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
पुण्यातील हडपसर भागात असलेल्या औद्योगिक वसाहतीत आस्थापनाच्या कचरा प्रकल्पाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
बालवयापासूनच नैतिकता शिकवणे आणि धर्मशिक्षण देणे किती अपरिहार्य आहे, हे अशा घटनांतून लक्षात येते !
गोवा विधानसभेच्या ४ दिवसीय हिवाळी अधिवेशनाला २५ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. चालू वर्षातील हे पहिले अधिवेशन असल्याने अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी सदस्यांना संबोधित करणार आहेत.