‘इशरत’चा अंत !

इशरत जहाँ प्रकरणासंबंधी निकालातून जिहादी आतंकवादाला पाठीशी घालणार्‍या काँग्रेसच्या भारतविरोधी पापावर ‘पुन्हा एकदा’ शिक्कामोर्तब झाले नि ‘इशरत’चा अंत झाला, असे म्हणायला आता अडचण नाही. अर्थात् यानिमित्ताने जनतेने भारतद्वेष्ट्या काँग्रेसला जाब विचारला पाहिजे.

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने आरंभलेल्या ‘ऑनलाईन’ सत्संग मालिकांच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने ‘कृतज्ञता सप्ताहा’चे आयोजन !

सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी अशा मालिका काळाची गरज असून हे सत्संग नियमितपणे पहावेत, असे आवाहन हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी केले आहे.

धर्मांधतेचा अतिरेक !

समान नागरी कायद्याच्या माध्यमातून जनतेला तिचा धर्म, लिंग, जात या आधारांवर नव्हे, तर सर्व समान अधिकार मिळू शकणार आहेत. अल्पसंख्यांक समाजात महिलेला उपभोगाची वस्तू म्हणून पाहिले जाते. असे असतांना या महिलेच्या याचिकेतून धर्मांधतेचा अतिरेक कसा असतो, याचाच अनुभव येतो.

उन्हाळ्यात कृष्णा नदी कोरडी पडणार नाही, यासाठी महापालिका कोयना प्रशासनाशी समन्वय साधू ! – दिग्विजय सूर्यवंशी, महापौर

महापौर पुढे म्हणाले, ‘‘प्रत्येक उन्हाळ्यात कृष्णा नदीतील पाणी पातळी अल्प झाल्याने सांगलीकरांना पाणीटंचाईचे संकट भेडसावते. पालकमंत्र्याच्या समवेतच्या बैठकीत कृष्णेची पातळी अल्प होताच तात्काळ कोयनेतून पाणी सोडण्याचे नियोजन केले जाणार आहे.

सचिन वाझे याला पुन्हा सेवेत घेणे, ही सरकारची चूक ! – अबू आझमी

सचिन वाझे याला पुन्हा पोलीस सेवेत घेण्यास माझा विरोध होता. त्यासाठी मी शरद पवार, संजय राऊत आणि अनिल देशमुख यांना सांगितले होते; पण माझे ऐकले गेले नाही. सरकारने ही मोठी चूक केली असे वक्तव्य अबू आझमी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले.

चिनी गुप्तचर संस्थेच्या कारवाया आणि भारताची भूमिका !

चीन भारताचा क्रमांक एकचा शत्रू आहे. त्यामुळे प्रत्येक भारतियाला चीनच्या गुप्तचर मोहिमेविषयी माहिती असणे देशाच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक आहे.’

भ्रमणभाष संचावर खेळ खेळण्यावरून आई-वडील ओरडल्याने १५ वर्षांच्या मुलाची आत्महत्या

मुलांना मनुष्यजन्माचे महत्त्व आणि त्याचा शाश्‍वत आनंदासाठी कसा वापर करायचा याचे शिक्षणच दिले जात नसल्याने ते अशाश्‍वत गोष्टीमध्ये अडकून त्यासाठी स्वतःचे मौल्यवान प्राण गमावून बसत आहेत. निधर्मी राज्यव्यवस्थेचा हा पराजय आहे !

१० वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाविषयी प्रगती अहवाल सादर करण्याचा न्यायालयाचा आदेश

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अन्यत्र २५ किलोमीटरचे काम १८ घंट्यांमध्ये पूर्ण करत असेल, तर मुंबई-गोवा महामार्गाविषयीच भेदभाव का केला जात आहे ? पथकर वसुलीसाठी मात्र तत्परतेने पावले उचलली जात आहेत’, असे अधिवक्ता पेचकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.