भ्रमणभाष संचावर खेळ खेळण्यावरून आई-वडील ओरडल्याने १५ वर्षांच्या मुलाची आत्महत्या

  • मुलांना मनुष्यजन्माचे महत्त्व आणि त्याचा शाश्‍वत आनंदासाठी कसा वापर करायचा याचे शिक्षणच दिले जात नसल्याने ते अशाश्‍वत गोष्टीमध्ये अडकून त्यासाठी स्वतःचे मौल्यवान प्राण गमावून बसत आहेत. निधर्मी राज्यव्यवस्थेचा हा पराजय आहे !
  • धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रात जीवनाचे महत्त्व आणि ध्येय सांगून व्यक्तीला शाश्‍वत आनंद घेण्यासाठी मार्गदर्शन करणारे शिक्षण देण्यात येईल आणि व्यक्तीकडून प्रत्यक्ष कृती करवून घेतली जाईल. त्यामुळे कुणीही आत्महत्या करणार नाही !
प्रातिनिधिक छायाचित्र

नोएडा (उत्तरप्रदेश) – आई-वडिलांनी ‘भ्रमणभाष संचावर खेळ खेळू नको’; असे ओरडल्याने १५ वर्षांच्या मुलाने बांधकाम चालू असलेल्या एका इमारतीवरून खाली उडी मारून आत्महत्या केल्याची येथे घटना घडली आहे. हा मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार पालकांनी केली होती. पालकांनी ओरडल्यामुळे हा मुलगा घरातून बाहेर पडला होता.