सूर्यनमस्कार स्पर्धेत श्रद्धा गोखले-लेले यांचा प्रथम क्रमांक

मिरजेत तेजोपासना परिवाराच्या वतीने रथसप्तमी आणि जागतिक सूर्यनमस्कार दिनी १ लाख ११ सहस्र १११ सूर्यनमस्काराचा संकल्प पूर्ण करण्यात आला. सूर्यनमस्कार स्पर्धेत मिरज येथील श्रद्धा गोखले-लेले यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठेच्या ‘स्टँडिंग वॉरंट’ विरुद्धचा पुनर्निरीक्षण अर्ज फेटाळला

‘यशस्विनी महिला ब्रिगेड’च्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठेने जिल्हा आणि सत्र न्यायालयात, पारनेर न्यायालयाने काढलेल्या ‘स्टँडिंग वॉरंट’ विरुद्ध पुनर्निरीक्षण अर्ज प्रविष्ट केला होता. त्यामध्ये वॉरंट रहित करण्याविषयी त्याने विनंती केली होती.

भरतमुनी यांच्या जयंतीच्या निमित्ताने २७ फेब्रुवारीला विविध कार्यक्रम

प्रतिवर्षीप्रमाणे संस्कार भारती सांगली यांच्या वतीने २७ फेब्रुवारी या दिवशी आद्य नाट्यशास्त्रकार भरतमुनी यांच्या जयंतीच्या निमित्ताने सौ. साधना कुलकर्णी आणि त्यांच्या शिष्या यांचे ‘नृत्याविष्कार’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

राहुल गांधी यांच्या विरोधातील याचिकेवर भिवंडी न्यायालयात १५ मे या दिवशी सुनावणी

जाहीर सभेत ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांची हत्या केली’, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अपकीर्ती झाल्याचा आरोप करून संघाच्या एका स्थानिक नेत्याने राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडी न्यायालयात अवमान याचिका प्रविष्ट केली.

झाडेगाव (जिल्हा बुलढाणा) येथे एकाच गावातील १५५ जणांना कोरोनाचा संसर्ग !

काही दिवसांपूर्वी गावात ७ दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमांचे गावकर्‍यांनी आयोजन केले होते. या कार्यक्रमांतून कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या कार्यक्रमांना गावकर्‍यांसहित बाहेरगावाहून काही मंडळी सहभागी झाली होती; मात्र कोरोनाचे कोणतेही नियम न पाळल्याने गावात संसर्ग पसरला.

पोहरादेवी येथील गर्दीप्रकरणी प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

पूजा चव्हाण आत्महत्येच्या प्रकरणात नाव घेण्यात येत असलेले वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २३ फेब्रुवारी या दिवशी कारवाई करण्याची सूचना दिली आहे.

शिर्डी येथे श्री साईदर्शनासाठी नवीन नियमावली, सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंतच दर्शन

पहाटेची काकड आरती आणि रात्रीच्या शेजारतीला भक्तांना उपस्थित रहाता येणार नाही. गुरुवार आणि सलग सुट्टीच्या दिवशी भक्तांना ‘ऑनलाईन’ पास बंधनकारक आहे, तर २५ फेब्रुवारी या दिवशी होणारा श्री साईपालखी सोहळा रहित करण्यात आला आहे.

शिवरायांची ‘जगदंबा’ तलवार परत न करणार्‍या इंग्लंडच्या क्रिकेट संघाला महाराष्ट्रात खेळू देणार नाही !

छत्रपती शिवाजी महाराजांची ‘जगदंबा’ तलवार भारताला परत न देणार्‍या इंग्लंडच्या क्रिकेट संघाला महाराष्ट्राच्या भूमीवर क्रिकेट खेळू देणार नाही.

कामाच्या वेळी २ सत्रांत, तसेच ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात ‘वर्क फ्रॉम होम’, तसेच २ सत्रांत कामाच्या वेळा निश्‍चित करण्याचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना दिले आहेत.

अस्लम शेख यांनी भेंडीबाजार आणि बेहराम पाडा येथेही मास्क लावण्याचा सल्ला द्यावा ! – संदीप देशपांडे, मनसे

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी ‘मास्क लावला नाही, तर दळणवळणबंदी करावी लागेल’, असे सांगितले. हाच सल्ला त्यांनी जरा भेंडीबाजार आणि बेहरामपाडा येथेही द्यावा, असे आवाहन मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केले आहे.