जुने गोवे येथे आणखी एक प्रकरण उघडकीस, २ जणांच्या विरोधात तक्रार

नोकरीचे आमीष दाखवून पैसे उकळल्याचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. सरकारी नोकरी देण्याचे आमीष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याची तक्रार शिवा मोरे आणि सरिता केरकर यांच्या विरोधात जुने गोवे पोलिसात प्रविष्ट (दाखल) झालेली आहे.

सातारा येथे चारचाकीतून ९५ लाख रुपयांची रोकड जप्त !

येथे पुणे-बेंगळुरू महामार्गावर वाहनांच्या पडताळणीत चारचाकीत ९५ लाख रुपयांची रोकड पोलिसांना सापडली आहे. ही रोकड कुणाची आहे ? याचा पोलीस शोध घेत आहेत. रोकड कह्यात घेतली असून मनोज गोयल आणि दिपू चव्हाण यांना कह्यात घेतले आहे….

आमचे सरकार आल्यावर पुढची ५ वर्षे जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवू ! – उद्धव ठाकरे

राज्यातील मुलींना राज्य सरकार विनामूल्य उच्चशिक्षण देणार आहे. त्याही पुढे जाऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास आम्ही राज्यातील मुलांनाही विनामूल्य शिक्षण देऊ; कारण दोघेही तितकेच महत्त्वाचे आहेत..

कॅनडा येथील मंदिरावरील आक्रमण निषेधार्ह ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा

ब्रॅप्टन, कॅनडा येथील हिंदु सभा मंदिरात खलिस्तान समर्थकांनी ३ नोव्हेंबर या दिवशी घुसून हिंदु भाविकांवर आक्रमण केले. ही घटना म्हणजे शांती, एकमेकांचा आदर राखणे आणि एकसंघ रहाणे, या तत्त्वांवर केलेले आक्रमण आहे. या घटनेचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो

सध्याच्या काळात प्रत्येकाने योग्य साधनेसह नामजप केला पाहिजे ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धत होती. त्यामुळे मुलांवर संस्कारही आपोआप होत होते. स्वातंत्र्यानंतरच्या काळात सर्व परिस्थिती पालटली असून आज कुठेही हिंदु धर्माविषयी ज्ञान दिले जात नाही. कोरोना संसर्गाच्या काळात लोकांना विज्ञानाची मर्यादा लक्षात..

कचरा व्यवस्थापनामध्ये पंचायती अनुत्तीर्ण, यापुढे आक्रमक धोरण अवलंबणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

गोवा सरकार कचरा व्यवस्थापन आणि निर्मूलन यांवर वर्षाकाठी ४०० कोटी रुपयांहून अधिक खर्च करत असते, तरीही पंचायत मंडळे, सचिव, संबंधित अधिकारी आणि नागरिक कचर्‍यासंबंधी दायित्वशून्यतेने वागतात.

‘बटेंगे तो कटेंगे’ ही पक्षाची भूमिका नाही ! – पंकजा मुंडे, आमदार, भाजप

‘बटेंगे तो कटेंगे’ हे काय सूत्र आहे का ? असे संदेश कुणीही  सामाजिक माध्यमांवर टाकतो. ही आमच्या पक्षाची भूमिका नाही. कुणीही जाती-धर्माचे राजकारण करू नये. आम्ही केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या विकासकामांच्या बळावर निवडणुकीला सामोरे जात आहोत….

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठलाचे २० नोव्हेंबरपर्यंत २४ घंटे दर्शन !

१२ नोव्हेंबर या दिवशी असलेल्या कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल आणि रुक्मिणीदेवी यांचे २४ घंटे दर्शन चालू करण्यात आले असून ते २० नोव्हेंबरपर्यंत चालू रहाणार आहे. ४ नोव्हेंबरला विधीवत् पूजा करून श्रींचा पलंग काढण्यात आला.

दौंड (पुणे) येथे गोरक्षकांनी केलेल्या कारवाईत १६ बैलांची सुटका !

गोवंश हत्याबंदी कायद्याचा काही उपयोग आहे कि नाही ?

सलमान खानला ठार मारण्याची धमकी देणारा तरुण अटकेत !

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सलमान खान याला ठार मारण्याची धमकी देणारा विक्रम (वय ३५ वर्षे) याला कर्नाटक येथून अटक करण्यात आली आहे.