पाटलीपुत्र येथे मशिदीमध्ये रहात असलेले १२ विदेशी मुसलमान पोलिसांच्या कह्यात

बिहारच्या पाटलीपुत्र या राजधानीमधील एका मशिदीमध्ये  विदेशी मुसलमान असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तेथे छापा मारून १२ विदेशी मुसलमानांना कह्यात घेतले आहे. हे सर्व जण १२ मार्च या दिवशी येथे पोचले होते; मात्र त्याविषयीची कोणतीच कल्पना पोलिसांना देण्यात आली नव्हती…..

संभाजीनगर येथे ‘सारी’ या व्याधीमुळे रुग्णाचा मृत्यू

येथील एका रुग्णाचे ‘सारी’ (सिव्हिअर अ‍ॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स) या व्याधीमुळे २४ मार्च या दिवशी निधन झाले. सारी आणि कोरोना यांची लक्षणे समान आहेत.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या पोचली ५२६ वर

देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५२६ झाली असून आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधिक म्हणजे १०१ रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून त्यानंतर केरळमध्ये ९५ रुग्ण आढळले आहेत.

पुण्यातील पहिल्या कोरोनाबाधित दांपत्याची चाचणी निगेटिव्ह

कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या वाढत्या संख्येने पुण्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र येथे आढळलेल्या पहिल्या कोरोनाबाधित दांपत्याची चाचणी ‘निगेटिव्ह’ आली आहे.

दळणवळणबंदीचे उल्लंघन केल्यास होऊ शकतो ६ मासांचा कारावास

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशातील अनेक राज्यांमध्ये ‘लॉकडाऊन’ (दळणवळणबंदी) करण्यात आले आहे.

आयकर परतावा भरण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ

अनेक राज्यांनी दळणवळणावर बंदी घातल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने करदात्यांच्या दृष्टीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी २४ मार्चला वस्तू आणि सेवा (जी.एस्.टी.) अन् आयकर परतावा यांविषयी महत्त्वपूर्ण घोषणा केली.

संचारबंदी असतांनाही रस्त्यावर विनाकारण फिरणार्‍यांना पोलिसांकडून चोप

कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी राज्यातील शहरी भागांत कलम १४४ लागू होते. २२ आणि २३ मार्चला मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडल्याने शेवटी राज्यशासनाने ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा कठोर निर्णय घेतला….

यवतमाळ येथे विलगीकरण कक्षात ६ जण भरती

स्व. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात भरती असलेल्या नागरिकांची संख्या ६ झाली आहे. त्यांपैकी ३ जण कोरोनाबाधित असून उर्वरित ३ जण निगराणीखाली आहेत.

‘होम क्वारंटाइन’ सांगितलेल्यांवर पोलिसांचे ‘व्हॉट्सअ‍ॅप ‘व्हिडिओ कॉल’द्वारे लक्ष

‘होम क्वारंटाइन’ सांगितलेले लोकही घराबाहेर पडून अन्यत्र फिरत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत आहेत. कल्याण-डोंबिवली पोलीस ‘व्हॉट्सअ‍ॅप ‘व्हिडिओ कॉल’द्वारे त्यांच्यावर लक्ष ठेवत आहेत.

कोरोना साथीमुळे नांदापूर (जिल्हा हिंगोली) गावात नवीन व्यक्तींना प्रवेशबंदी

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर शहरी भागासमवेतच ग्रामीण भागातही खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या जात असून जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील नांदापूर येथील गावकर्‍यांनी नवीन व्यक्तींना गावात प्रवेशबंदी केली आहे.