…‘तर जनतेचा विश्‍वास कायमचा उडून आपण अराजकतेच्या दिशेने जाऊ !’ – राज ठाकरे

या प्रकरणाचे राज्यात निष्पक्ष अन्वेषण होईल, याची मला मुळीच निश्‍चिती नाही. केंद्रशासनानेही नीट चौकशी केली नाही, तर मात्र जनतेचा विश्‍वास कायमचा उडेल आणि आपण अराजकतेच्या दिशेने जाऊ, अशी चिंता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे येथील सिनेमा, नाटक चालू; परंतु सांस्कृतिक कार्यक्रम रहित !

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकारने सध्या नाट्यगृहांमध्ये तसेच मल्टिप्लेक्समध्ये आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने प्रयोग करण्यास अनुमती दिली आहे; परंतु त्याच जागी नियम पाळून सांस्कृतिक किंवा सामाजिक कार्यक्रम तसेच व्याख्याने घेण्यास बंदी घातली आहे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रत्येक हिंदूने कृतीशील होणे, हीच स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानवंदना असेल ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे अखंड हिंदुस्थानचे प्रणेते, मातृभाषेचा अभिमान असलेले, राष्ट्रीय अस्मिता असलेले, दूरदर्शी, प्रतिभासंपन्न क्रांतीवीर साहित्यिक. साहित्यिकही अनेक असतात आणि क्रांतीकारकही अनेक होऊन गेले; मात्र स्वातंत्र्यवीर सावरकारांसारखा क्रांतीवीर साहित्यिक हा ‘यासम हाच !’

सत्ता बळकावण्यासाठी मोदी शासन आणि भाजप यांची कुठल्याही पातळीवर जाण्याची सिद्धता ! – सचिन सावंत, काँग्रेस

या वेळी सचिन सावंत म्हणाले, ‘‘ज्या पद्धतीने महाराष्ट्रात जाणीवपूर्वक वातावरण निर्माण केले जात आहे, हे वातावरण देश पातळीवरती जिथे-जिथे विरोधी पक्षांची सरकारे आहेत, तेथे निर्माण केले जात आहे.

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी निलंबित पोलीस अधिकार्‍यासह एका सट्टेबाजाला अटक

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या प्रकरणात आतंकवादविरोधी पथकाने आणखी २ जणांना अटक केली आहे. यात निलंबित पोलीस अधिकारी विनायक शिंदे आणि सट्टेबाज नरेश धरे यांचा समावेश आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या त्यागपत्रासाठी सांगली आणि कोल्हापूर येथे भाजपच्या वतीने निदर्शने

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस उपनिरीक्षक सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचे ‘टार्गेट’ दिले असल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा सामना करतांना पुण्यातील महानगरपालिका यंत्रणेकडून नियमांचे उल्लंघन

महानगरपालिकेकडूनच नियमांचे उल्लंघन होऊ लागले, तर कोरोनावर नियंत्रण कसे आणणार ?

गृहमंत्र्यांच्या त्यागपत्रासाठी मुंबईत आंदोलन करणारे भाजपचे नेते आणि कार्यकर्ते यांना अटक

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या त्यागपत्रासाठी दादर रेल्वेस्थानकाच्या बाहेर आंदोलन करणार्‍या भाजपच्या नेत्यांना पोलिसांनी अटक केली.

तीनहून अधिक रुग्ण आढळल्यास ५० मीटर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार !

महापालिका, पोलीस, उत्पादन शुल्क यांसह विविध शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून १९ मार्चपासून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.

बँक डेटा चोरी प्रकरणी एकाच खात्यात १०० कोटी रुपये असल्याची माहिती उघड

देशभरातील वेगवेगळ्या अधिकोषातील काही खात्यांची गोपनीय माहिती मिळवणे आणि त्यांची विक्री करून त्याद्वारे कोट्यावधी रुपये कमवणे असा कट नुकताच पुणे सायबर पोलिसांनी उघडकीला आणला आहे. या प्रकरणात आतापर्यंत ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे.