कोल्हापूर शहरात गारांचा वर्षाव

अनेक दिवसांच्या उकाड्यानंतर त्रस्त झालेल्या कोल्हापुराकरांना २९ एप्रिल या दिवशी सायंकाळी ५ वाजता गारांच्या वर्षावाचा आनंद लुटला. मोठ्या प्रमाणात पडलेल्या आणि मोठ्या आकाराच्या गारांमुळे काही काळ रस्तेही पांढरे शुभ्र झाले होते.

पुस्तके घरपोच वितरण करण्यास परवानगी द्या ! – मराठी प्रकाशक संघाची मागणी

केरळच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही पुस्तकांचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये करावा आणि दळणवळण बंदीच्या काळात पुस्तकांचे घरपोच वितरण करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

संभाजीनगर येथे कोरोनाग्रस्तांच्या साहाय्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स हेल्प रायडर्सची विनामूल्य सेवा !

सध्या कोरोनाचे संकट वाढलेले असतांना शहरातील अनेक नातेवाइकांना विविध सुविधा मिळवण्यात अडचणी येत आहेत.रुग्णालयात जागा मिळवून देणे, अ‍ॅम्ब्युलन्स, प्लाझ्मा डोनेशन, बाहेरून लागणारी औषधे नेऊन देण्याचे काम हा ग्रुप करत आहे.

लसीचा साठा संपल्यामुळे पुण्यातील बहुतांश लसीकरण केंद्रे बंद !

कोरोना प्रतिबंधक लस संपल्यामुळे २८ एप्रिल या दिवशी शहरातील सर्वच लसीकरण केंद्रे अनिश्‍चित कालावधीसाठी बंद झाली आहेत. ज्या केंद्रांमध्ये कोवॅक्सिनचा साठा आहे, त्याच केंद्रांवर लसीकरण काही प्रमाणात चालू आहे. लसीचा साठा उपलब्ध होण्याविषयी अनिश्‍चितता आहे.

इंदापूर (पुणे) येथे अवैध ऑक्सिजन साठा जप्त, भरलेले ५१ सिलिंडर ताब्यात !

इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील एम्.आय.डी.सी.मधील वाय अ‍ॅक्सिस स्ट्रक्चरल स्टील प्रा. लि. या आस्थापनात इंदापूर पोलिसांनी धाड टाकत ७ लाख ५५ सहस्र ७०० रुपयांचा अवैध ऑक्सिजन साठा जप्त केला.

सिंधुदुर्गातील एस्.टी. कर्मचार्‍यांना आता ‘बेस्ट’ परिवहन सेवेत पाठवले जाणार नाही

मुंबई येथे सेवेसाठी गेलेल्या अनेक कर्मचार्‍यांना, तसेच त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

कणकवली येथे ट्रकमधून ३२ लाख रुपयांचे अवैध मद्य पोलिसांच्या कह्यात

पोलिसांनी मद्य वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक आणि ट्रकचालक यांना कह्यात घेतले आहे.

गृहअलगीकरणात असलेले कोरोनाबाधित रुग्ण सार्वजनिक ठिकाणी वावरत असल्याच्या तक्रारी

गोव्यात गृहअलगीकरणात असलेले कोरोनाबाधित रुग्ण कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला उत्तरदायी !

अनुष्ठानाच्या तपोबलाने महामारीचा लय करूया ! – सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी

अनुष्ठानासाठी संकल्पबद्ध होण्यासाठी पुढील लिंकवर नावनोंदणी करावी – https://forms.gle/pPpJFLpUmqUjrBGL8

सावंतवाडी नगरपरिषदेच्या २ कर्मचार्‍यांचा मृत्यू

सिंधुदुर्गात गेल्या २४ घंट्यांत १५ जणांचा मृत्यू