सातारा जिल्हा रुग्णालयासह कस्तुरबा रुग्णालयात केवळ १०० जणांनाच लस !

संथ गतीने लसीकरण झाल्यास कोरोनाला प्रतिबंध कसा करणार ? नागरिकांच्या मनात शंका

महाराष्ट्रातील दळणवळण बंदीमध्ये १५ मेपर्यंत वाढ

राज्यात ३० एप्रिलपर्यंत असलेली दळणवळण बंदी १५ मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. २८ एप्रिल या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मागील ३ दिवसांत राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या न्यून होत आहे.

गोव्यात आज सायंकाळपासून ४ दिवसांसाठी दळणवळण बंदी

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यशासनाने २९ एप्रिल या दिवशी सायंकाळी ७ वाजल्यापासून ३ मे या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत दळणवळण बंदीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २८ एप्रिल या दिवशी दुपारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍या मशिदीवर तहसीलदारांनी घातली धाड !

कोडगू जिल्ह्यातील विराजपेटे तालुक्यातील अर्जी या गावातील एका मशिदीत १५० पेक्षा अधिक मुलांना धार्मिक उपदेश देण्यात आला. मशिदीच्या बाहेर मात्र कोविड नियमानुसार मशीद बंद करण्यात आल्याचा मोठा फलक लावण्यात आला होता

अमरावती (आंध्रप्रदेश) येथे रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह दुचाकीवरून नेऊन अंत्यसंस्कार !

राज्यातील श्रीकाकुळम् येथे मृत झालेल्या ५० वर्षीय महिलेचा मृतदेह नेण्यास रुग्णवाहिका न मिळाल्याने दुचाकीवरून तो स्मशानभूमीत नेण्यात आला. त्यानंतर त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लाच मागितल्याच्या आरोपावरून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे अन्वेषण होणार

निलंबन रहित होण्यासाठी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी २ कोटी रुपयांची लाच मागितल्याची तक्रार निलंबित पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी केली होती. या तक्रारीवरून परमबीर सिंह यांचे प्राथमिक अन्वेषण करण्याचा आदेश शासनाकडून गृहविभागाला देण्यात आला आहे.

राजस्थानमध्ये काँग्रेसच्या तृतीयपंथी नगरसेविकेकडून मास्क न घालणार्‍या साधूंना मारहाण

पिलीबंगामधील काँग्रेसच्या तृतीयपंथी नगरसेविका पूनम महंत यांनी मास्क न घातल्यामुळे दोघा साधूंना मारहाण केल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. या प्रसंगात पूनम महंत यांनी स्वतःच मास्क लावला नसल्याचे दिसत आहे.

संभाजीनगर येथील मिनी घाटी जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनच्या गळक्या सिलिंडरमुळे रुग्णाचा तडफडून मृत्यू

अपोलो रुग्णालयात उपचार घेणारे सुनील मगरे यांची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे २७ एप्रिलच्या रात्री आधुनिक वैद्यांनी मगरे यांना मिनी घाटी जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी पाठवले. रुग्णवाहिकेतून घाटी रुग्णालयात आणल्यानंतर रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी त्यांना ऑक्सिजनचा रिकामा सिलिंडर लावला.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

वणी येथे सीटीस्कॅन यंत्राच्या अभावी तालुक्यातील रुग्णांची जिल्ह्याच्या ठिकाणी पायपीट !