अमरावती येथे प्रिस्क्रिप्शन दाखवून विनामूल्य ऑक्सिजन सिलिंडर घेऊन जा !
‘श्रीवल्लभ ऑक्सिजन प्लँट’चा उपक्रम, बजरंग दलाकडून सिलिंडरची घरपोच सेवा चालू !
‘श्रीवल्लभ ऑक्सिजन प्लँट’चा उपक्रम, बजरंग दलाकडून सिलिंडरची घरपोच सेवा चालू !
राज्यातील मोठे ५ विभाग वगळता सहस्रो बालके शाळाबाह्य असणे गंभीर आहे. अशीच स्थिती राहिली तर देश विकासाच्या दिशेने कसा जाणार ? यावर लवकरात लवकर उपाय काढणे आवश्यक आहे.
राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे अन्वेषणासाठी येण्यास नकार दिला आहे. ‘अन्वेषण करणार्या अधिकार्यांनी ई मेलद्वारे प्रश्न पाठवल्यास त्यांची ई मेलवरून उत्तरे देईन’, असे उत्तर शुक्ला यांनी पाठवले आहे.
‘परमबीर सिंह हे पोलिसांच्या स्थानांतरांसाठी प्रत्येकी १ कोटी रुपये घेत होते. त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा’, अशी मागणी बी.आर्. घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांना होती.
राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण चालू आहे; मात्र अनेक ठिकाणी लसीचा पुरवठा अपुरा आहे. मुंबईतही लसीअभावी पुढचे किमान ३ दिवस लसीकरण बंद राहील, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी २९ एप्रिल या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.
बोरिवली येथील गीतांजली जैन मंदिरात पहाटे ५ वाजता श्री. प्रकाश शहा यांनी जैन धर्माची दीक्षा घेत मुनी बनण्याचा मार्ग स्वीकारला. ते ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’सारख्या एका मोठ्या आस्थापनात उच्च पदावर काम करत होते; मात्र मोठ्या वेतनाची नोकरी सोडून त्यांनी मुनी होण्याचा मार्ग स्वीकारला आहे.
सैन्यदलातून निवृत्त झालेल्या राज्यातील वैद्यकीय अधिकार्यांना कोरोना व्यवस्थापन कार्यात घेण्यात यावे, अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यशासनाला केली आहे.
परमबीर सिंह यांनी या याचिकेत म्हटले आहे की, १९ एप्रिल या दिवशी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या भेटीत त्यांनी ‘अनिल देशमुख यांच्या विरोधातील पत्र मागे घ्या, जेणेकरून त्यांच्या विरोधातील खटल्याला महत्त्व उरणार नाही. तुम्ही संपूर्ण व्यवस्थेशी लढू शकणार नाही.
पहिल्या महायुद्धाच्या वेळी म्हणजे वर्ष १९१५ मध्ये ओटोमन साम्राज्याच्या सैनिकांनी आर्मेनियन लोकांच्या केलेल्या वंशविच्छेदाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मान्यता दिली आहे.
संचारबंदीचे उल्लंघन करणार्या ९० जणांवर कामोठे पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. राज्यात कडक निर्बंधांची घोषणा करूनही विनाकारण रस्त्यांवर फिरणार्या, तसेच क्रिकेट, व्हॉलिबॉलसारखे खेळ खेळणार्यांवर नवी मुंबई पोलीस पथकाकडून कारवाई केली जात आहे.