मुंबई – सैन्यदलातून निवृत्त झालेल्या राज्यातील वैद्यकीय अधिकार्यांना कोरोना व्यवस्थापन कार्यात घेण्यात यावे, अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यशासनाला केली आहे. याविषयी २७ एप्रिल या दिवशी राज्यपालांनी सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सीमा व्यास आणि सैनिक कल्याण मंडळाचे अधिकारी यांच्या दूरभाषच्या माध्यमातून चर्चा केली. या वेळी भगतसिंह कोश्यारी म्हणाले, ‘‘सैन्यदलातील अधिकार्यांना समाजात सन्मान आणि प्रतिष्ठा आहे. त्यामुळे त्यांच्यासह सैन्यदलातून निवृत्त झालेले बिगर वैद्यकीय अधिकारी, निवृत्त सैनिक यांचेही या कार्यात साहाय्य घेतल्यास त्याचा राज्याला लाभ होईल.’’