नवी मुंबई – संचारबंदीचे उल्लंघन करणार्या ९० जणांवर कामोठे पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. राज्यात कडक निर्बंधांची घोषणा करूनही विनाकारण रस्त्यांवर फिरणार्या, तसेच क्रिकेट, व्हॉलिबॉलसारखे खेळ खेळणार्यांवर नवी मुंबई पोलीस पथकाकडून कारवाई केली जात आहे. या कारवाईमध्ये महिला, मुली आणि वयोवृद्ध नागरिकांचा समावेश आहे. या सर्वांना कामोठे पोलीस ठाण्याच्या आवारात उभे करून समज देण्यात आली, तसेच त्यांच्याकडून ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.