पिसवली (कल्याण) येथे ४ बांगलादेशींच्या मुसक्या आवळल्या

महंमद हुसेन, तौसिफ शेख, लकी शेख आणि रुक्साना शेख अशी त्यांची नावे आहेत. महंमदला बांगलादेशातून भारतात येत असतांना सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी अटक केली होती.

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबत नाहीत, तोपर्यंत भारत-बांगलादेश यांच्यातील क्रिकेट सामने रहित करा !

अशी मागणी का करावी लागते ? मंडळ स्वत: कृती का करत नाही ?

सांगली, मिरज आणि कुपवाड येथे मिरवणुकीत डॉल्बी आणि लेझर यांचा वापर !

सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांत गणेशोत्सव मंडळांनी काढलेल्या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर न करता डॉल्बीसारख्या कानठळ्या बसवणार्‍या आवाजात ध्वनीप्रदूषण करत मिरवणूक काढण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८५ गावांनी राबवली ‘एक गाव एक गणपति’ संकल्पना !

कन्नड शहर, ग्रामीण, पिशोर, देवगाव रंगारी या ४ पोलीस ठाण्यांत एकूण २८९ सार्वजनिक मंडळांची नोंदणी झाली. यांपैकी ८५ गावांनी शासनाची ‘एक गाव एक गणपति’ ही संकल्पना राबवली आहे.

सोलापूरहून विमान वाहतूक चालू होण्याचा मार्ग झाला मोकळा !

सोलापूर विमानतळासाठी आवश्यक असलेली सुरक्षा संमती (सिक्युरिटी क्लिअरन्स) मिळाली आहे.

निलंबित केलेल्या सहयोगी प्राध्यापकाच्या चौकशीनंतर कारवाई होणार ! – मुंबई महानगरपालिका

नायर रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी सहयोगी प्राध्यापकाला पालिका प्रशासनाने निलंबित केले.

चिंचवड (पुणे) येथील ‘बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय’ गेल्या ८ वर्षांपासून बंद स्थितीत !

महापालिकेच्या छत्रपती संभाजीनगर येथील ‘बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय’ नूतनीकरण आणि सुशोभिकरणाच्या नावाखाली गेले ८ वर्षांपासून बंद आहे.

आपले सरकार आल्यास जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करू ! – उद्धव ठाकरे

आपले सरकार आणा. मी देशभरातून सातत्याने मागणी केली जाणारी जुनी निवृत्तीवेतन (पेन्शन) योजना लागू करण्याची मागणी मान्य करतो, असे विधान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

आता एस्.टी.च्या आगार प्रमुखांकडे तक्रार करणे सहज शक्य ! – एस्.टी. महामंडळ

एस्.टी.च्या प्रवासात प्रवाशांना काही अडचण आल्यास त्यांना त्याविषयी थेट आगार प्रमुखांकडे तक्रार करता येणार आहे.

महाराष्ट्राला ‘घुसखोरमुक्त राज्य’ करा ! – धर्मयोद्धा डॉ. सुरेश चव्हाणके

देशात १० कोटी घुसखोर आहेत, यातील ८० लाख ते १ कोटी घुसखोर एकट्या महाराष्ट्रात आहेत. घुसखोरांमुळे राज्याच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.