आपले सरकार आल्यास जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करू ! – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे

वैजापूर (जिल्हा संभाजीनगर) – आपले सरकार आणा. मी देशभरातून सातत्याने मागणी केली जाणारी जुनी निवृत्तीवेतन (पेन्शन) योजना लागू करण्याची मागणी मान्य करतो, असे विधान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.

माजी आमदार सुभाष देसाई यांना ८४ सहस्र रुपये निवृत्तीवेतन

याच सभेत बोलतांना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार सुभाष देसाई म्हणाले, ‘‘निवृत्तीवेतन हे केवळ निवृत्त सरकारी कर्मचार्‍यांनाच मिळत नाही, तर लोकप्रतिनिधींनाही मिळते. मला ८४ सहस्र रुपये निवृत्तीवेतन मिळते. पंतप्रधान मोदी आज घरी बसले, तर त्यांना ९० सहस्र रुपये निवृत्तीवेतन मिळेल. कुठलाही नेता एकदा खासदार झाला, तर त्याला २५ सहस्र रुपयांचे निवृत्तीवेतन लागू होते. दुसर्‍यांदा खासदार झाल्यावर त्यात अजून १० सहस्र रुपये वाढवले जातात. तिसर्‍यांदा खासदार झाल्यावर आणखी १० सहस्र रुपयांची भर पडते. मोदी तीन वेळा खासदार झाले आहेत. त्यामुळे त्यांना ४५ सहस्र रुपये मिळतील. महागाई भत्ता म्हणून अधिक ४५ सहस्र रुपये त्यांना मिळतील.’’