आता एस्.टी.च्या आगार प्रमुखांकडे तक्रार करणे सहज शक्य ! – एस्.टी. महामंडळ

तक्रारीसाठी दूरभाष क्रमांक उपलब्ध

मुंबई – एस्.टी.च्या प्रवासात प्रवाशांना काही अडचण आल्यास त्यांना त्याविषयी थेट आगार प्रमुखांकडे तक्रार करता येणार आहे. त्यानंतरच तक्रारीचे तातडीने निराकरण होईल, अशा पद्धतीची यंत्रणा उभी करण्यात आली आहे, ही माहिती एस्.टी. महामंडळाने दिली. एस्.टी. बसमध्ये चालकाच्या मागील बाजूस संबंधित बस ज्या आगारातील आहे, त्या आगारप्रमुखांचा दूरभाष क्रमांक, तसेच तेथील स्थानकप्रमुख आणि कार्यशाळा अधीक्षक यांचाही दूरभाष क्रमांक लिहिण्यात आला आहे. चालक अतीवेगाने गाडी चालवत असेल, गाडी चालवतांना तो भ्रमणभाषवर बोलत असेल, तसेच वाहक उद्धटपणे बोलत असेल किंवा वाहकाने योग्य ठिकाणी उतरवले नाही, अशा अनेक तक्रारी प्रवासी करत असतात; मात्र तक्रार नेमकी कुठे करावी ? हे त्यांना कळत नाही. यापूर्वी एस्.टी. बसमध्ये संबंधित आगार आणि स्थानक यांचा क्रमांक प्रसिद्ध केलेला असायचा.

संपादकीय भूमिका

तक्रारींचे निराकरण करण्यासह संबंधित दोषी चालक किंवा वाहक यांच्यावर कारवाईही व्हायला हवी, ही प्रवाशांची अपेक्षा !