कन्नड तालुक्यात एकूण २८९ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची झाली स्थापना !
छत्रपती संभाजीनगर – कन्नड शहर, ग्रामीण, पिशोर, देवगाव रंगारी या ४ पोलीस ठाण्यांत एकूण २८९ सार्वजनिक मंडळांची नोंदणी झाली. यांपैकी ८५ गावांनी शासनाची ‘एक गाव एक गणपति’ ही संकल्पना राबवली आहे.
१० दिवसांच्या गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वरिष्ठ आणि कनिष्ठ पोलीस अधिकारी आपापल्या पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळांच्या बंदोबस्तावर लक्ष ठेवून आहेत. यामुळे शहरातील ग्रामीण भागातील वातावरण भक्तीमय झाले आहे. कन्नड शहर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात ६४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्री गणेशमूर्तींची स्थापना केली.
२६ गावांत ‘एक गाव एक गणपति’ संकल्पना गणेशोत्सव मंडळानी राबवली. कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात ७० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी गणेशमूर्तींची स्थापना केली. १० गावांत ‘एक गाव एक गणपति, पिशोर पोलीस ठाणे क्षेत्रात ११६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी २५ गावांत ‘एक गाव एक गणपति’, संकल्पना राबवली. देवगांव रंगारी पोलीस ठाणे अंतर्गत ३९ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी स्थापना केली असून ५ गावांनी ‘एक गाव एक गणपति’ संकल्पना राबवण्यात आली.