महाराष्ट्राला ‘घुसखोरमुक्त राज्य’ करा ! – धर्मयोद्धा डॉ. सुरेश चव्हाणके

नागपूर येथे भव्य संकल्प सभा

श्री. सुरेश चव्हाणके
या मोहिमेच्या समर्थनासाठी  ९२०२ २०४ २०४ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकतो, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

नागपूर – देशात १० कोटी घुसखोर आहेत, यातील ८० लाख ते १ कोटी घुसखोर एकट्या महाराष्ट्रात आहेत. घुसखोरांमुळे राज्याच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. ‘घुसखोरमुक्त मोहिमे’साठी सशक्त लोकआंदोलनाची आवश्यकता असून महाराष्ट्राला ‘घुसखोरमुक्त राज्य’ करा, असे प्रतिपादन धर्मयोद्धा आणि ‘सुदर्शन’ वाहिनीचे प्रमुख संपादक डॉ. सुरेश चव्हाणके यांनी येथे केले.

येथील गीता मंदिरात ‘सिव्हिल सोसायटी ऑफ महाराष्ट्र’च्या वतीने ‘घुसखोरमुक्त महाराष्ट्र संकल्प सभे’चे आयोजन करण्यात आले होते. भारतीय मुसलमान समुदायालाही या मोहिमेत सहभागी होऊन परदेशी घुसखोरांना बाहेर काढण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले. घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी संविधानाच्या आणि कायद्याच्या आधारावर उपाययोजना कशा प्रकारे करता येऊ शकते ? त्यावर प्रकाश टाकला.

ते पुढे म्हणाले की, हे आंदोलन पूर्णपणे गैर-राजकीय असेल आणि यात सर्व देशभक्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा. नागरिकांनी जागरूक राहून संघटित कृती करणे ही भारताच्या प्रत्येक नागरिकांचे दायित्व आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि आपली पुढील पिढी सुरक्षित रहाण्यासाठी जनता एन्.आर्.सी. मोहिमेकडे राष्ट्रीय कर्तव्य म्हणून बघितले जावे. राज्य आणि केंद्र सरकारने या दिशेने कठोर पावले उचलावीत आणि नागरिकांच्या सहकार्याने या समस्येचे निराकरण करावे.

या वेळी साधू-संत यांची वंदनीय उपस्थिती होती, तसेच नागपूरचे राजे मुधोजी राजे भोसले, कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतिया, सेना, वायूदल आणि नौदल यांचे माजी अधिकारी आणि सैनिक, मोठे उद्योजक आणि विविध संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अतुल अर्वेन्ला यांनी केले.

क्षणचित्रे 

१. विषय ऐकून उपस्थित नागरिक स्वतःचे कटू अनुभव स्वतः सांगत होते.

२. कार्यक्रमाच्या शेवटी शपथ घेण्यात आली. या सगळ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.