शिकागो (अमेरिका) येथे इस्रायलच्या समर्थनार्थ अमेरिकी भारतियांकडून मोर्चे !

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षामध्ये इस्रायलला समर्थन देण्यासाठी अमेरिकेतील शिकागो शहरात अमेरिकी भारतियांनी २ मोर्चे काढले. त्यांनी हमास या जिहादी आतंकवादी संघटनेवर इस्रायलमधील ज्यू नागरिकांवर आक्रमण करण्याचा आरोप केला.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताचा पॅलेस्टाईनला पाठिंबा

भारताचे या परिषदेतील प्रतिनिधी टी.एस्. तिरुमूर्ती यांनी बैठकीत म्हटले की, आम्ही दोन्ही देशांना संयम बाळगण्याची आणि तणाव वाढवणार्‍या कारवाया रोखण्याचे आवाहन करत आहे.

अनेक मोठ्या देशांनी कोरोना मृतांचा आकडा लपवला !

कोरोना काळात अनेक देशांनी अनेकांच्या मृत्यूंच्या आकडेवारीची नोंदच केलेली नाही. अनेक मोठ्या देशांनी मृतांचा खरा आकडा जगापासून लपवला असल्याचा दावा वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या ‘हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशन इन्स्टिट्यूट’ने एका विश्‍लेषणात केला आहे.

कोविशिल्ड लसीच्या २ डोसमधील कालावाधी वाढवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे तज्ञांकडून स्वागत !

भारतात कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील कालावधी ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवडे करण्यात आला आहे. एकीकडे या निर्णयावर टीका होत असतांना दुसरीकडे तज्ज्ञांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.

अमेरिकेतील सर्वांत मोठ्या तेल वाहिनीवर सायबर आक्रमण

अमेरिकेतील सर्वांत मोठ्या तेल वाहिनीवर सायबर आक्रमण करण्यात आल्यानंतर प्रशासनाने आणीबाणीची घोषणा केली आहे. ज्या कोलोनियल आस्थापनावर हे आक्रमण झाले ते प्रतिदिन २५ लाख बॅरेल कच्च्या तेलाचा पुरवठा करते.

कोरोना नियंत्रणासाठी चीनने केले, तेच आता भारतानेही करावे !

जगभरातील देशांनी भारताला लस निर्मितीसाठी साहाय्य केले पाहिजे किंवा भारताला अधिकाधिक लसी दान दिल्या पाहिजेत. एका वर्षापूर्वी चीनने ज्याप्रकारे कोरोनासंदर्भात वापरासाठी रुग्णालये उभारली होती, तो आदर्श भारताने घेणे आवश्यक आहे.

गेल्या ६ वर्षांपासून चीनकडून जैविक शस्त्रांद्वारे तिसरे महायुद्ध करण्याचे नियोजन !

कोरोनाचे संकट हे चीनने प्रारंभ केलेले तिसरे महायुद्ध आहे, हे यातून लक्षात येते ! त्यामुळे आता संपूर्ण जगाने संघटित होऊन चीनच्या विरोधात उभे ठाकले पाहिजे !

बंद केलेल्या भ्रमणभाष क्रमांकाचा वापर पैसे चोरण्यासाठीही केला जाऊ शकतो ! – संशोधनाचा निष्कर्ष

नवीन ग्राहक रिसायकल केलेल्या क्रमांकाद्वारे जुन्या ग्राहकाच्या क्रमाकांशी निगडीत माहिती पाहू शकतात. त्यांच्या बँक खात्यातील पैशांची चोरी केली जाऊ शकते.

भारताने लसीकरणाचा वेग वाढवणे आवश्यक !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फाऊची यांचा सल्ला भारतात ‘फिल्ड रुग्णालये’ उभारली पाहिजेत

अमेरिकेत कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांना मास्क लावण्याची आवश्यकता नाही !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीदेखील ट्वीट करत यावर शिक्कामोर्तब केले आहे. यापूर्वी इस्रायलमध्येही मास्क न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.