अनेक मोठ्या देशांनी कोरोना मृतांचा आकडा लपवला !

  • वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या ‘हेल्थ मेट्रिक्स अ‍ॅण्ड इव्हॅल्यूएशन इन्स्टिट्यूट’चा दावा

  • संपूर्ण जगात सरकारी आकडेवारीपेक्षा ११३ टक्के अधिक मृत्यू झाल्याचा दावा

  • भारतानेही मृत्यूसंख्या लपवल्याचा कांगावा

वॉशिंग्टन – कोरोना काळात अनेक देशांनी अनेकांच्या मृत्यूंच्या आकडेवारीची नोंदच केलेली नाही. अनेक मोठ्या देशांनी मृतांचा खरा आकडा जगापासून लपवला असल्याचा दावा वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या ‘हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशन इन्स्टिट्यूट’ने एका विश्‍लेषणात केला आहे.

या संस्थेच्या मतानुसार रशियात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची आकडेवारी सरकारी आकडेवारीपेक्षा ५ पट अधिक आहे. भारत आणि मेक्सिको येथील सरकारी आकडेवारीपेक्षा २ पट अधिक मृत्यू झाले आहेत. संपूर्ण जगात सरकारी आकडेवारीपेक्षा ११३ टक्के अधिक मृत्यू झाले आहेत. अनेक देशांनी त्यांच्या ज्या भागांत मोठ्या प्रमाणात चाचण्या झाल्या नाहीत, अशा ठिकाणची कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या अल्प सांगितली.