भारताने लसीकरणाचा वेग वाढवणे आवश्यक !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फाऊची यांचा सल्ला

डॉ. अँथनी फाऊची

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारतातील परिस्थिती चिंताजनक आहे. कोरोनाचा संसर्गही गतीने होत आहे. अमेरिकेतही एका दिवसात ३ लाख रुग्ण सापडले होते. भारतात रुग्णालयांतील खाटांची संख्या तात्काळ वाढवण्याची आवश्यकता आहे. सैन्याच्या साहाय्याने युद्धाच्या वेळी जशी रुग्णालये उभारली जातात तशी ‘फिल्ड रुग्णालये’ उभारली पाहिजेत, असा सल्ला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फाऊची यांनी भारत सरकारला दिला आहे.

‘संकटाच्या वेळी भारताने अन्य देशांना साहाय्य केले होते. आता अन्य देशांनी भारताला साहाय्य करायला हवे’, असे आवाहन त्यांनी जगाला केले आहे. डॉ. फाऊची यांनी ‘भारताला २-३ आठवड्यांची दळणवळण बंदी लागू करणे आवश्यक आहे. तसेच लसीकरण प्रक्रिया वेगवान केली पाहिजे,’ असा सल्लाही दिला आहे.