कोविशिल्ड लसीच्या २ डोसमधील कालावाधी वाढवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे तज्ञांकडून स्वागत !

वॉशिंग्टन – भारतात कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील कालावधी ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवडे करण्यात आला आहे. एकीकडे या निर्णयावर टीका होत असतांना दुसरीकडे तज्ज्ञांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.

१. अमेरिकेचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फाउची यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

२. ब्रिटनमध्ये हा कालावधी १२ आठवडे असल्याचे ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान सल्लागार समूहा’ने म्हटले आहे.

३. अमेरिका, पेरू आणि चिली या देशांमध्ये करण्यात आलेल्या चाचणीनुसार, ‘लसीच्या २ डोसमध्ये ४ आठवड्यांहून अधिक अंतर असल्यास दुसरा डोस ७९ टक्क्यांपेक्षा अधिक प्रभावी ठरतो.’