लंडन येथे हिंदु विद्यार्थिनीची मुसलमान प्रियकराकडून हत्या

भारतीय वंशांची १९ वर्षीय तरुणी सबिता थानवानी हिची हत्या केल्याच्या प्रकरणी महीर मारूफ या धर्मांधाला अटक करण्यात आली आहे. तो मूळचा ट्युनिशिया येथील रहिवासी आहे.

खरसॉन शहरात रशियन सैन्याने निःशस्त्र आंदोलकांवर गोळीबार केल्याचा युक्रेनचा आरोप

या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओत गोळीबाराच्या वेळी नागरिक जीव वाचवण्यासाठी पळापळ करतांना दिसत आहेत.

रशियाकडून मरियुपोल शहरातील तब्बल ९० टक्के इमारतींवर आक्रमण !

मरियुपोल शहर रशियाकडे कह्यात देण्याविषयी रशियाने दिलेला निर्वाणीचा इशारा युक्रेनने धुडकावला. ‘आम्ही आत्मसमर्पण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’, असे युक्रेनने सुनावले आहे.

युक्रेनमध्ये असलेला युरोपमधील सर्वांत मोठा स्टील प्रकल्प रशियाच्या आक्रमणात उद्ध्वस्त !

युक्रेनच्या मारियुपोलमध्ये असलेला युरोपमधील सर्वांत मोठा स्टील प्रकल्प कह्यात घेण्यासाठी रशियाच्या सैन्याकडून प्रयत्न केला जात आहे. रशियन सैन्याच्या आक्रमणात हा प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.

न्यूझीलंडमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’च्या प्रसारणाला आधी दिलेली अनुमती आता नाकारली !

न्यूझीलंडसारखा अभिव्यक्तीस्वातंत्र्य, मानवतावाद आणि धर्मनिरपेक्षता यांचा ढोल बडवणार्‍या न्यूझीलंडने असा निर्णय घेऊन त्याचे खरे स्वरूप जगासमोर आणले आहे. भारत सरकारने हा विषय उचलून धरून हा चित्रपट तेथे पुन्हा प्रसारित होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत !

रशिया ‘जी.पी.एस्.’ या जागतिक तंत्रज्ञानापासून वेगळा पडण्याची शक्यता !

रशियावर नवीन निर्बंध लागू करण्याच्या अनुषंगाने अमेरिका रशियाला इंटरनेटद्वारे ठिकाण दर्शवणारे ‘जी.पी.एस्.’ या जागतिक तंत्रज्ञानापासून वेगळे पाडण्याची शक्यता आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन अणूबाँब टाकण्याचा प्रयत्न करू शकतात ! – अमेरिकेची भीती

रशियाने हायपरसोनिक क्षेपणास्त्राद्वारे युक्रेनच्या क्षेपणास्त्रांचा साठा केला उद्ध्वस्त

युद्धामध्ये १४ सहस्रांहून अधिक रशियन सैनिक ठार ! – युक्रेनचा दावा

युक्रेनी सैन्याने सांगितले की, त्यांनी आतापर्यंत लेफ्टनंट जनरल अथवा मेजर जनरल पदाच्या ५ रशियन सैन्याधिकार्‍यांना ठार केले आहे.

युक्रेनला प्रादेशिक अखंडता आणि न्याय मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत ! – व्लोदिमिर झेलेंस्की, राष्ट्राध्यक्ष, युक्रेन

दुसरीकडे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी जर्मनीच्या चॅन्सलर यांच्याशी दूरभाषवरून चर्चा केली. या वेळी पुतिन यांनी ‘युक्रेन शांतता बैठकांमध्ये रशियासमोर अवास्तव प्रस्ताव ठेवून अडथळे निर्माण करत आहे’, असा आरोप केला.

रशियाची युक्रेनवरील सैनिकी कारवाई ‘नाटो’साठी ‘विद्युत् झटका’ !

वर्ष २०१९ मध्ये मॅक्रॉन यांनी ‘नाटो’ला ‘मृत झालेली संघटना’ असे संबोधले होते. मॅक्रॉन यांनी मी पूर्ण विचार करून हे वक्तव्य केले आहे. रशियाच्या कारवाईतून ‘नाटो’ने जागृत होणे आवश्यक आहे, असेही मॅक्रॉन म्हणाले.