युक्रेनच्या ऐतिहासिक शहर लिविवजवळ रशियाकडून क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण !

लिविव हे ऐतिहासिक शहर असून त्याच्याजवळ करण्यात आलेले हे आक्रमण गंभीर असल्याचे मानले जात आहे.

पोलंड, स्लोवेनिया आणि झेक रिपब्लिक या देशांच्या पंतप्रधानांनी जीव धोक्यात घालून गाठले युक्रेन !

युक्रेनने पोलंड, स्लोवेनिया आणि झेक रिपब्लिक या युरोपीय देशांच्या पंतप्रधानांच्या शौर्याचे कौतुक केले आहे. युक्रेनला समर्थन देण्यासाठी या तिघा नेत्यांनी धोका पत्कारून पोलंड ते युक्रेनची राजधानी कीवपर्यंत आगगाडीने प्रवास केला.

‘पेस’ या युरोपीय देशांच्या परिषदेतून रशियाची हकालपट्टी !

‘पेस’ म्हणजे ‘पार्लियामेंट्री असेंब्ली ऑफ द कॉन्सिल ऑफ युरोप’ (युरोपीय परिषदेची संसदीय विधानसभा) या युरोपीय संघटनेने रशियाची हाकालपट्टी केली आहे. ‘रशियन टीव्ही’ने दिलेल्या माहितीनुसार २१९ सदस्यांपैकी २१६ जणांनी रशियाच्या विरोधात मत दिले.

रशिया-युक्रेन युद्ध तातडीने थांबवा ! – आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेश

रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेले युद्ध तातडीने थांबवावे, असा आदेश येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (‘इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस’ने) दिला.

देवासाठी तरी हे हत्याकांड थांबवा ! – पोप फ्रान्सिस

रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर पोप यांची भावनिक साद !

रशिया लवकरच ‘नाटो’च्या सदस्य देशांवरही आक्रमण करील ! – युक्रेनची चेतावणी

या वेळी झेलेंस्की यांनी पुन्हा एकदा ‘नॉटो’ने रशियासाठी ‘नो फ्लाय झोन’ (प्रतिबंधित हवाई क्षेत्र) घोषित करण्याचा पुनरूच्चार केला. युक्रेनची ही मागणी यापूर्वी ‘नाटो’ने फेटाळली होती.

रशिया युक्रेनमध्ये निर्माण करू शकते अन्नसंकट !

रशियाने केलेल्या बाँबस्फोटात युक्रेनमधील धान्य गोदामाला आग लागली आहे. रशिया युक्रेनमध्ये अन्न संकट निर्माण करू शकते. कीव शहराचा नाश करण्यासाठी रशिया धडक पावले उचलत आहे.

हिंदु धर्मामुळे प्रभावित होऊन नामजप करत लढत आहे युक्रेनियन सैनिक ‘आंद्रे’ !

युद्धभूमीवर एका हातात ‘एके-४७’, तर दुसर्‍या हातात जपमाळ ! युद्धासारख्या प्रतिकूल परिस्थितीतही लढणारा युक्रेनियन सैनिक ‘आंद्रे’ याच्यासारखी भगवंतावरील श्रद्धा किती हिंदूंमध्ये आहे ?

मारियुपोल (युक्रेन) येथे अन्न-पाण्यासाठी नागरिकांकडून एकमेकांवर होत आहेत आक्रमणे !

भविष्यात येणार्‍या आत्पकाळात भारतात अशी स्थिती निर्माण झाल्यास जनता त्याला सामोरे जाण्यास सिद्ध आहेत का ?

रशियाकडून क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा : युक्रेनच्या राजधानीला दोन्ही बाजूंनी वेढा

युक्रेनने ब्रोवरीमध्ये रशियाला चोख प्रत्युत्तर देतांना रशियाचे ५ रणगाडे उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे. रशिया युक्रेनवर रणगाडे, ‘पॅराट्रूपर्स’, पायदळ, ‘अँटी-टँक गाईडेड मिसाईल्स’ आदी शस्त्रांद्वारे आक्रमण करत आहे.