न्यूझीलंडमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’च्या प्रसारणाला आधी दिलेली अनुमती आता नाकारली !

धर्मांध संघटनांनी केला होता विरोध !

प्रसारणाला अनुमती नाकारणे, हा स्वातंत्र्यावर घाला ! – विन्स्टन पीटर्स, माजी उपपंतप्रधान, न्यूझीलंड

  • न्यूझीलंडसारखा अभिव्यक्तीस्वातंत्र्य, मानवतावाद आणि धर्मनिरपेक्षता यांचा ढोल बडवणार्‍या न्यूझीलंडने असा निर्णय घेऊन त्याचे खरे स्वरूप जगासमोर आणले आहे. भारत सरकारने हा विषय उचलून धरून हा चित्रपट तेथे पुन्हा प्रसारित होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत ! – संपादक
  • हिंदु धर्म, चालीरिती आदींवर चिखलफेक करणार्‍या चित्रपटांचा विरोध केल्यावर हिंदूंना अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे डोस पाजणारे तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी, साम्यवादी आणि ‘तुकडे तुकडे गँग’ आता गप्प का ? हा त्यांचा हिंदुद्वेष्टा दुटप्पीपणा आहे, हे जाणा ! – संपादक
डावीकडे विन्स्टन पीटर्स, माजी उपपंतप्रधान, न्यूझीलंड

नवी देहली – न्यूझीलंडच्या सेन्सॉर बोर्डाने आधी अनुमती दिलेल्या ‘द कश्मीर फाइल्स’च्या प्रसारणावर आता बंदी घातली आहे. काही धर्मांध संघटनांनी या चित्रपटाला विरोध करत सेन्सॉर बोर्डाकडे चित्रपट प्रसारित न करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सेन्सॉर बोर्डाने हा निर्णय घेतला. न्यूझीलंडचे माजी उपपंतप्रधान विन्स्टन पीटर्स यांनी मात्र या निर्णयाचा विरोध केला आहे. ते म्हणाले, ‘‘कोणत्याही स्वरूपाच्या आतंकवादाचा विरोध आणि त्यासंदर्भात जागृती होणे आवश्यक आहे. हा निर्णय म्हणजे न्यूझीलंडच्या नागरिकांच्या आणि जागतिक समुदायाच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्यासमानच आहे.’’

पीटर्स यांनी फेसबूक पोस्टद्वारे पुढे म्हटले आहे, ‘द कश्मीर फाइल्स’च्या प्रसारणावर बंदी लादणे हे एकप्रकारे न्यूझीलंडमधील १५ मार्चच्या आतंकवादी आक्रमणाचा विषय ‘सेन्सॉर’ (बंदी आणणे) करण्यासारखेच आहे, तसेच ९/११ च्या अमेरिकेतील आक्रमणाच्या संदर्भातील स्मृती नष्ट करण्यासमानच हा निर्णय आहे. १५ मार्च २०१९ या दिवशी देशातील क्राईस्टचर्च येथे जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारामध्ये ५१ न्यूझीलँडर्स ठार झाले होते.