रशियाचा युक्रेनध्ये ‘उत्तर’ आणि ‘दक्षिण’ युक्रेन निर्माण करण्याचा प्रयत्न ! – युक्रेनचा दावा

रशियाला संपूर्ण युक्रेनवर नियंत्रण मिळवता न आल्याने तो आता युक्रेनध्ये ‘उत्तर’ आणि ‘दक्षिण’ कोरिया यांच्याप्रमाणे ‘उत्तर युक्रेन’ आणि ‘दक्षिण युक्रेन’ निर्माण करण्याचा प्रयत्न करील. त्यातील एका भागावर रशियाचे नियंत्रण असेल…

रशियाने उत्तर अटलांटिक महासागरात तैनात केल्या आण्विक पाणबुड्या !

पाश्चात्त्य देशांच्या गुप्तचर संघटना पुतिन यांच्या आण्विक शस्त्रांच्या ताफ्यावर लक्ष ठेवून आहेत.

नाराज रशियन सैनिकांनी स्वतःच्याच कर्नलला रणगाड्याखाली चिरडून मारले ! – पाश्चात्त्य देशांतील अधिकार्‍यांचा दावा

गेल्या मासाभरापासून रशियाच्या युक्रेनविरोधातील सैनिकी कारवाया चालू असूनही त्याला युक्रेनवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. एकूण परिस्थिती पहाता रशियन सैनिकांचे मनोधैर्य खचू लागले आहे, असे म्हटले जात आहे.

पुतिन हे युद्ध गुन्हेगार ! – अमेरिका

दुसर्‍या विश्‍वयुद्धानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी युद्धग्रस्त देशाच्या सीमेच्या अगदी जवळ भेट देण्याची पहिलीच वेळ !

युक्रेनने रशियन सैन्यावर केली ‘शक्तीशाली आक्रमणे’ ! – युक्रेन

युक्रेनच्या सैन्याने २५ मार्च या दिवशी मोठी कामगिरी केल्याचा दावाही केला गेला आहे. युक्रेनी सैन्याने राजधानी कीवजवळील ३ शहरे रशियाच्या कह्यातून मुक्त केली आहेत.

जर्मनीमध्ये कोरोनाचे जवळपासन तीन लाख, तर फ्रान्समध्ये दीड लाख नवे रुग्ण आढळले !

‘मॉडर्ना’ आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बन्सल म्हणाले की,  कोरोनाचा नवा प्रकार आधीच्या प्रकारापेक्षा २० टक्के अधिक धोकादायक असण्याची शक्यता आहे.

भारत अमेरिकेच्या रशियाविरोधी भूमिकेला जुमानत नाही !

‘रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध चालू होऊन एक मास उलटला असला आणि भारतावर पाश्चात्त्य देश अन् विशेषकरून अमेरिका यांच्याकडून रशियाच्या विरोधात भूमिका घेण्याचा दबाव आणला जात असला, तरी भारत याला जुमानत नाही. भारत आणि रशिया यांच्यातील संबंधांवर विशेष विपरीत परिणाम होणार नाहीत’, असे या लेखात म्हटले आहे.

रशियाला शह देण्यासाठी ‘नाटो’ ४ तुकड्या पाठवणार

शिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धास प्रारंभ होऊन एक मास उलटला असून यासंदर्भात एक तातडीची बैठक घेण्यासाठी ‘नाटो’चे (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’चे) सर्व सदस्य देश बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे शिखर संमेलनाच्या निमित्ताने एकत्रित आले आहेत.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत युक्रेनविषयीच्या रशियाच्या प्रारूपावरील मतदानात भारत तटस्थ

चीनने या प्रारूपास पाठिंबा दिला. दुसरीकडे इस्रायलने रशियाची भीती दाखवून ‘पेगासस’ हे गुप्तचर ‘सॉप्टवेअर’ युक्रेनला देण्यास नकार दिला आहे.

झेलेंस्की यांच्याकडून पोप फ्रान्सिस यांना युद्धासंदर्भात मध्यस्थी करण्याचे आवाहन !

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी जगभरातील ख्रिस्त्यांचे धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांच्याशी रशिया-युक्रेन युद्धाविषयी चर्चा केली. ‘रशियासमवेत चालू असलेल्या युद्धाला पूर्णविराम मिळावा’, यासाठी पोप यांनी मध्यस्थी करावी, असे आवाहनही झेलेंस्की यांनी या वेळी केले.