Russia Ukraine War : युक्रेनचे सैन्‍य रशियात ३० किलोमीटर आतपर्यंत घुसले

रशियाच्‍या परराष्‍ट्र मंत्रालयाच्‍या प्रवक्‍त्‍या मारिया झाखारोवा यांनी सांगितले की, रशियाच्‍या सैन्‍याकडून चोख प्रत्‍युत्तर दिले जाईल.

Vinesh Phogat CAS Hearing : विनेश फोगाट हिला रौप्‍यपदक देता येणे शक्‍य नाही ! – आंतरराष्‍ट्रीय ऑलिंपिक महासंघाची भूमिका

ऑलिंपिक स्‍पर्धेमध्‍ये भारताच्‍या महिला कुस्‍तीपटू विनेश फोगाट यांनी ५० किलो वजनी गटात अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती; परंतु अंतिम फेरीच्‍या सामन्‍याआधी केलेल्‍या वजनात त्‍यांचे वजन ५० किलो १०० ग्रॅम इतके होते. त्‍यामुळे त्‍यांना अंतिम सामन्‍यात खेळण्‍यासाठी अपात्र ठरवण्‍यात आले.

Brazil Plane Crash : ब्राझिलमध्‍ये झालेल्‍या विमान अपघातात सर्व ६२ लोकांचा मृत्‍यू !

ब्राझिलिया येथील विन्‍हेडो प्रांतात मोठी विमान दुर्घटना घडली असून त्‍यात असलेल्‍या सर्व ६२ जणांचा मृत्‍यू झाला आहे. स्‍थानिक वेळेनुसार ९ ऑगस्‍टच्‍या दुपारी १.४५ वाजता हा अपघात झाला. यात ५८ प्रवासी यांच्‍यासह वैमानिक आणि ३ कर्मचारी असे ६२ जण प्रवास करत होते.

Egyptian Wrestler Arrested : पॅरिस ऑलिंपिक : इजिप्‍तचा कुस्‍तीपटू महंमद अलसाईद याला लैंगिक छळाच्‍या आरोपाखाली अटक !

आता कुणी या घटनेवरून या कुस्‍तीपटूचा धर्म आणि महिला अत्‍याचार यांचा संबंध जोडल्‍यास आश्‍चर्य वाटू नये !

Salwan Momika Hindu Attack : बांगलादेशातील मुसलमानांकडून तेथील हिंदूंचा होत आहे नरसंहार ! – सलवान मोमिका

जे युरोपातील एका नेत्याला वाटते, ते भारतातील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना अथवा राजकीय पक्षांना का वाटत नाही ? कि वाटते, पण बोलण्याचे धाडस करत नाहीत ?

Vinesh Phogat : भारतीय कुस्‍तीपटू विनेश फोगट यांचे वजन अधिक असल्‍याने अपात्र !

पॅरिस ऑलिम्‍पिक २०२४ मध्‍ये महिला कुस्‍तीच्‍या ५० किलो वजनी गटाच्‍या अंतिम सामन्‍यापूर्वी विनेश फोगट यांना अपात्र ठरवण्‍यात आले आहे. केवळ १०० ग्रॅम वजन अधिक असल्‍याने त्‍यांना अंतिम सामन्‍यापूर्वी अपात्र घोषित करण्‍यात आले.

MP Geert Wilders : बांगलादेशातील हिंदूंवरील इस्‍लामी आक्रमणे थांबवा ! – खासदार गीर्ट विल्‍डर्स

युरोपीय देशातील एक खासदार बांगलादेशातील हिंदूंविषयी सहानुभूती दाखवतो. या उलट भारतातील किती हिंदु लोकप्रतिनिधी बांगलादेशातील सोडाच, भारतातील पीडित हिंदूंविषयी अशी सहानुभूती दाखवतात ?

Violent U.K. Riots : दंगलखोरांना कायद्याच्‍या सामर्थ्‍याची जाणीव करून दिली जाईल ! – ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्‍टार्मर

ब्रिटनमध्‍ये आठवडाभरापासून चालू असलेल्‍या दंगलीच्‍या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान कीर स्‍टार्मर यांनी म्‍हटले आहे, ‘दंगलखोरांना कायद्याच्‍या सामर्थ्‍याची जाणीव करून दिली जाईल. अटक केलेल्‍यांना आठवडा संपण्‍यापूर्वी न्‍यायालयाकडून ठोस शिक्षा दिली जाईल, अशी आशा आहे.

Attacks on police in Britain : ब्रिटनच्या १५ शहरांत पोलिसांवर आक्रमणे, पोलीस ठाण्यांत जाळपोळ !

ब्रिटनच्या साऊथपोर्ट येथे २९ जुलैला एका १७ वर्षीय मुलाने ३ मुलींची चाकूने भोसकून हत्या केल्यावरून ब्रिटनमध्ये हिंसाचार झाला होता. आता याचे लोण १५ शहरांमध्ये पसरले आहे.

London Conversion of Hindu student to Islam : लंडन (ब्रिटन) येथील शाळेत ७ वर्षाच्या हिंदु विद्यार्थ्याचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणारे ३ मुसलमान मुले निलंबित !

७ वर्षांच्या हिंदु मुलाचे त्याच्या समवेत शिकणार्‍या मुसलमान विद्यार्थ्यांनी धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.