|
व्हॅटिकन सिटी – पाद्रयांना विवाह करण्याची अनुमती दिली पाहिजे. याविषयी रोमन कॅथॉलिक चर्चने गांभीर्याने विचार केला पाहिजे. कदाचित् मी पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या असे विधान करत आहे, असे ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे ज्येष्ठ सल्लागार असणारे माल्टाचे आर्चबिशप (वरिष्ठ पाद्री) चार्ल्स साईक्लूना यांनी म्हटले आहे. चार्ल्स साईक्लूना यांनी पाद्रयांनी केलेल्या मुलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणांची चौकशी केली होती. त्यामुळे त्यांनी केलेल्या वरील विधानाला अधिक महत्त्व आहे.
Leading #Vatican Archbishop Charles Scicluna says Celibacy for Priests Should be Optional as it is in the Eastern #Catholic Rites and as it was Formerlyhttps://t.co/1eVDFVafkh pic.twitter.com/A6bEZnUrd8
— Catholic News World (@catholicnews1) January 8, 2024
पाद्रीही कुणाच्या तरी प्रेमात पडू शकतात !
चार्ल्स साईक्लूना म्हणाले की, पाद्रयांना पहिल्या १ सहस्र वर्षांमध्ये विवाहाची अनुमती होती. हा इतिहास नमूद आहे. जर माझ्या अधिकारात असते, तर मी ‘पाद्रयांना ब्रह्मचर्येचे पालन करावे लागते’, या नियमाचे संशोधन केले असते. यामुळे चर्चला अनेक चांगल्या पाद्रयांना गमवावे लागले आहे; कारण अशांनी पाद्री बनण्याऐवजी विवाह करण्याचा निर्णय घेतला. माझ्या अनुभवातून लक्षात येते की, पाद्रयांच्या विवाहाच्या अनुमतीविषयी गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. चर्चमध्ये ब्रह्मचर्येला निश्चित एक स्थान आहे; मात्र हाही विचार करायला हवा की, कधी कधी पाद्रीही कुणाच्या तरी प्रेमात पडू शकतात. अशा वेळी पाद्रयांना त्यांची प्रेयसी किंवा ‘पाद्रीपद’ यांपैकी एक निवडावे लागते. काही पाद्री तर असे संबंध लपवून ठेवतात.
Statement by Archbishop Charles Scicluna, a Senior Advisor to Pope Francis
Priests should be allowed to marry.
Scicluna had investigated cases of sexual abuse of children by priests.
In Christian countries that consider themselves developed and modern, it's virtually… pic.twitter.com/EOoBk62Mkr
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 9, 2024
संपादकीय भूमिका
|