भारतासमवेत अनेक क्षेत्रांत कार्य करत असून आमचा एकमेकांवर विश्‍वास आहे !

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांचे वक्तव्य !

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन

दावोस (स्वित्झर्लंड) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लेखनीय गोष्टी प्राप्त केल्या आहेत. भारत त्यांच्या नेतृत्वाखाली असाधारण यशोगाथा लिहित आहे. भारत आता एका नव्या स्तरावर पोचला आहे. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती जो बायडेन एकत्रितरित्या विकासावर काम करत आहेत. आम्ही देश अनेक क्षेत्रांत एक दुसर्‍यासमवेत कार्य करत असून आमचा एकमेकांवर विश्‍वास आहे, असे वक्तव्य अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी केले. ब्लिंकन सध्या येथे चालू असलेल्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या संमेलनात सहभागी होण्यासाठी आले आहेत.

भारताची आर्थिक प्रगती आणि पायाभूत सुविधांची उभारणी होत असली, तरी हिंदु राष्ट्रवादाचा उदय हा चिंतेचा विषय आहे का, अशा एका पत्रकाराच्या खोचक प्रश्‍नावर ब्लिंकन म्हणाले की, अमेरिका आणि भारत नेहमीच चर्चा करत आले आहेत. यात लोकशाही आणि मौलिक अधिकार यांच्याशी संबंधित सर्व पैलूंचाही समावेश आहे. आम्ही नियमित आणि वस्तूनिष्ठपणे चर्चा करत असतो. (भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना ही लोकशाहीच्या पैलूंना धरूनच होणार, नव्हे, तर त्यामुळेच लोकांचे जीवन खर्‍या अर्थाने आनंदी होणार, हे हिंदूंनी हिंदुद्वेष्ट्यांना ठणकावून सांगितले पाहिजे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • असे फुकाचे बोल बोलण्यापेक्षा भारताच्या मनात खर्‍या अर्थाने विश्‍वास निर्माण करायचा असेल, तर अमेरिकेने खलिस्तानी आतंकवाद्यांना भारताच्या सुपूर्द केले पाहिजे !