Paris Attack : पॅरिसमध्ये आयफेल टॉवरजवळ ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत केलेल्या आक्रमणात जर्मन पर्यटकाचा मृत्यू

जगभरातील अशा घटना थांबवण्यासाठी त्या कोणत्या विचारसरणीमुळे होत आहेत, त्यावर बंदी घालणे आता आवश्यक झाले आहे !

आतंकवादी कृत्याला कधी विसरू नका, कधीही क्षमा करू नका ! – ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त

‘आतंकवादासारखे असे भयंकर कृत्य कधीही विसरू नका, त्याला क्षमा करू नका आणि असे कृत्य पुन्हा होऊ देणार नाही’, हीच आमची भूमिका आहे.’

New Zealand Smoking : न्यूझीलंड सरकार तंबाखू आणि सिगारेट यांवरील बंदी उठवणार !

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये न्यूझीलंडमधील तत्कालीन  सरकारने तंबाखू आणि सिगारेट यांच्यावर बंदी घालणारा ऐतिहासिक कायदा केला होता. असे असले, तरी आताच्या नवीन सरकारने ही बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकशाहीविरोधी मशिदींना कह्यात घेऊन पाडले पाहिजे ! – जिमी एकेसन, सोशल डेमोक्रेट्स पक्षाचे नेते, स्विडन

ज्या मशिदींमध्ये लोकशाहीविरोधी, स्विडनविरोधी आणि ज्यूविरोधी प्रचार केला जात आहे, अशा मशिदींना कह्यात घेऊन त्यांना पाडले पाहिजे, असे विधान येथील स्विडन सोशल डेमोक्रेट्स पक्षाचे नेत जिमी एकेसन यांनी एका कार्यक्रमात भाषण करतांना केले.

मुसलमानांनो, नेदरलँड्स सोडा आणि अन्य कोणत्याही इस्लामी देशात चालते व्हा !

एक जुन्या व्हिडिओत नेदरलँड्सचे संभाव्य भावी पंतप्रधान गीर्ट विल्डर्स यांनी वक्तव्य केल्याचा दावा

Dublin Riots : शरणार्थी मुसलमानाच्या आक्रमणामुळे डबलिनमध्ये हिंसाचार !

लहान मुलांवर आक्रमण झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ २०० लोकांच्या हिंसक जमावाने केलेल्या आक्रमणात १३ दुकानांना आग लावण्यात आली. कट्टर राष्ट्रवादी गटाने केलेल्या या हिंसाचारात पोलिसांची ११ वाहने, ३ बस आणि १ ट्राम यांनाही आग लावण्यात आली.

गीर्ट विल्डर्स नेदरलँड्सचे पंतप्रधान बनणार !

अ‍ॅम्स्टरडॅम येथील ‘फ्रिडम पार्टी’ने सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक ३७ जागा जिंकल्यामुळे पक्षाचे अध्यक्ष गीर्ट विल्डर्स पंतप्रधान बनणार आहेत. त्यासाठी त्यांना अन्य राजकीय पक्षाशी युती करावी लागणार आहे.

Netherlands : कट्टर इस्लामविरोधी नेते गीर्ट विल्डर्स होऊ शकतात नेदरलँड्सचे पंतप्रधान !

कट्टर राष्ट्रनिष्ठा बाळगणार्‍या, म्हणजे उजवी विचारसरणी असणार्‍या राजकीय पक्षांचे सत्तेवर येण्याचे प्रमाण युरोपात वाढले !

५० वर्षांपूर्वी चोरण्यात आलेल्या देवतांच्या ८ व्या शतकातील २ मूर्ती लंडन येथे भारताकडे सुपुर्द !

भारतातून चोरण्यात आलेल्या देवतांच्या ८ व्या शतकातील २ मूर्ती येथे भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्या उपस्थितीत पुन्हा भारताकडे सुपुर्द करण्यात आल्या.

जगाने भारताचे आभार मानले पाहिजे ! – परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी टीकाकारांना सुनावले

रशिया-युक्रेन युद्धात भारताने रशियाकडून तेल खरेदी केले, त्यामुळे जगालाच लाभ झाला. जर भारताने तेल खरेदी केले नसते, तर तेलाचा बाजार अस्थिर झाला असता आणि महागाईत वाढ झाली असती.