कोल्हापुरात पोलिसांना पुढील काळात १५ दिवसांची सक्तीची रजा !

सततच्या ताणामुळे मानसिक स्थिती तणावग्रस्त असते. त्याचा परिणाम नियमित कामकाजावर होत आहे. त्यात कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नाही. याकरीता वर्षातील १५ दिवस अशी रजा सक्तीने कर्मचार्‍यास घ्यावी लागणार आहे.

नवीन महाविद्यालय चालू करतांना त्याच्या मान्यतेसाठी ५० सहस्र रुपये मागितल्याचा आरोप !

पुणे विद्यापिठाच्या अधिसभेत समारोपाच्या वेळी झालेल्या आरोपामुळे खळबळ !

‘बार्क’चे माजी अधिकारी दासगुप्ता मुख्य सूत्रधार ! – पोलिसांचा आरोप

मनोरंजन वाहिन्या आणि क्रीडा वाहिन्या यांनीही टी.आर्.पी. वाढवण्यासाठी गैरमार्ग अवलंबल्याची माहिती पुढे आल्याचा दावा गुन्हे शाखेने केला.

मांगोरहिल, वास्को येथील श्री अय्यप्पा मंदिरातील महोत्सवाला आजपासून प्रारंभ

मांगोरहिल येथील श्री अय्यप्पा मंदिरात १३ ते २० जानेवारी या कालावधीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांची प्रकृती स्थिर असून ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत !  डॉ. बांदेकर, अधिष्ठाता, गोमेकॉ

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांची प्रकृती स्थिर असून ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत, असे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बांदेकर यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या प्रसारासाठी सामाजिक माध्यमांचा वापर !

निवडणुका असलेल्या गावातील प्रभागात लढतीतील उमेदवार ‘डिजिटल’ प्रचारावर भर देत आहेत. याद्वारे प्रतिस्पर्धी उमेदवारांवर टीका-टिप्पणी केली जात आहे.

शिवप्रेमी संघटनेच्या वतीने राजमाता जिजाबाई यांच्या जयंतीदिनी नूतनमूर्तीचे अनावरण

येथील शिवप्रेमी आणि शिवप्रेमी संघटना यांच्या वतीने जिजामाता चौकातील राजमाता जिजाबाई यांच्या नूतनमूर्तीचे अनावरण करण्यात आले. त्यांच्या जयंतीदिनी शहरातील प्रतिष्ठित नागरिक देवदत्त नाडकर्णी यांच्या हस्ते या मूर्तीचे अनावरण करण्यात आले.

तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्याकडून ‘व्हॉट्सअ‍ॅप’ अकाऊंट बंद

अमेरिकी अ‍ॅप बंद करून स्वदेशीचा आग्रह धरणार्‍या तुर्कस्ताच्या राष्ट्राध्यक्षांकडून भारतीय नेते आणि जनता काही शिकतील का ?

ब्रेक निकामी झाल्याने घारपी घाटात एस्.टी.ला अपघात

घारपी येथून बांद्याच्या दिशेने येतांना घारपी-बांदा ही एस्.टी. बस  घारपी घाटात कोसळून अपघात झाला. ही घटना १२ जानेवारीला सकाळी घडली. बसमध्ये एकूण ११ प्रवासी होते.

मये येथील ग्रामस्थांना सनद देण्याची प्रक्रिया मार्गी लावण्याची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची डिचोलीच्या जिल्हाधिकार्‍यांना सूचना

‘‘उत्तर गोवा जिल्हा कार्यालयाच्या साहाय्याने डिचोली उपजिल्हाधिकारी कार्यालयाने मये येथील ग्रामस्थांना मालमत्तेचा अधिकार देण्याची प्रक्रिया चालू केली आहे.