महाराष्ट्राचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांची एन्.सी.बी.कडून चौकशी
या प्रकरणाची सरकारने तात्काळ नि:पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असेच जनतेला वाटते !
या प्रकरणाची सरकारने तात्काळ नि:पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असेच जनतेला वाटते !
उपमहापौर राजेश काळे यांना भाजप पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. राजेश काळे यांच्यावर महापालिका आयुक्त आणि उपायुक्त यांना खंडणीसाठी धमकावणे, शिवीगाळ करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, असे आरोप उपायुक्त धनराज पांडे यांनी दिलेल्या तक्रारीत करण्यात आले होेते.
शेळ-मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्प रहित केल्याचे शासनाने लेखी आश्वासन द्यावे. ग्रामस्थांना शासनाचे तोंडी आश्वासन नको, तसेच शासनाने ग्रामस्थांच्या विरोधात प्रविष्ट केलेल्या सर्व तक्रारी मागे घ्याव्यात, अशी मागणी शेळ-मेळावली ग्रामस्थांनी केली आहे.
येथील ‘यशस्विनी ब्रिगेड’च्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे अद्याप पसार असून त्याचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. तरीही तो अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. यामुळे तपास रेंगाळला असून संशयाला वाव मिळत आहे.
सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा येथून सकाळी ६ वाजता सुटणारी साटेली, कोंडुरे, आरोस बाजार, रोणापाल, मडुरा, शेर्ला ते बांदा ही बसगाडी शाळेच्या आणि महाविद्यालयाच्या तसेच गोरगरीब कामगार, छोटे-मोठे भाजी विक्रेते यांच्यासाठी चालू होती.
प्रत्यक्षात हे आतंकवादी मोकाटच फिरतात आणि त्यांच्या कारवाया चालू असतात, असे यापूर्वी आतंकवादी हाफिज सईद याच्या उदाहरणातून उघड झाले आहे !
१२ गावांतील गावकर्यांनी वारंवार मागणी करूनही स्वतंत्र ग्रामपंचायत सिद्ध न करणे हे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना लज्जास्पद आहे.
मेळावली प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेले ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’चे (आर्.जी.) मनोज परब आणि रोहन कळंगुटकर यांना येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने १३ जानेवारी या दिवशी सशर्त जामीन संमत केला.
१६ ते २४ जानेवारी या कालावधीत राजधानी पणजी शहरात होणार्या ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (आंचिम) जागतिक पॅनोरमा विभागात झळकणार्या चित्रपटांची सूची घोषित झाली आहे. यंदा जागतिक पॅनोरमा विभागात एकूण ५० चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
या सोहळ्यानिमित्त सम्मती कट्टा परिसर फुलांनी आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला होता. या वेळी पालखीचे पूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रतिवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणारा हा सोहळा या वर्षी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत आणि शासनाच्या नियमांचे पालन करत पार पडला.