रेखा जरे हत्या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा !

रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे यांची मागणी

नगर – येथील ‘यशस्विनी ब्रिगेड’च्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे अद्याप पसार असून त्याचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. तरीही तो अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. यामुळे तपास रेंगाळला असून संशयाला वाव मिळत आहे.

त्यामुळे या हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टातजलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, या खटल्यात सरकारतर्फेरच्या वतीने बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकीलअधिवक्ता म्हणून उज्ज्वज्ज्वल निकम किंवा उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती करण्यात यावी, अशा मागण्या जरे यांचा मुलगा रुणाल जरे यांनी सरकारकडे केल्या आहेत.  जरे यांनी त्यांचे अधिवक्ता चन पटेकर यांच्यावतीनेपोलीस अधीक्षकांपासूृहमंत्री, पालकमंत्री यांच्यासह मुख्यमंत्र्यांपर्यंत संबंधितांना निवेदन पाठवून ही मागणी केली आहे.