कर्नाटक सरकार ऑनलाईन खेळांवर बंदी घालणार

इंटरनेटवर ऑनलाईन खेळावर राज्यात लवकरच बंदी घालण्यात येईल, अशी माहिती कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. काँग्रेसचे नेते दिनेश गुंडुराव यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

चुरू (राजस्थान) येथील गोशाळेतील ८० गायींचा अचानक मृत्यू

गायींचा मृत्यू चार्‍यातून विषबाधा झाल्यामुळे किंवा आजारामुळे झाला आहे का? याचा शोध घेतला जात आहे.

किल्ले रायगडवर दुसरा ‘रोप वे’ उभारणार ! – खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले

रायगडावर नव्याने दुसरा ‘रोप वे’ प्राधिकरणाच्या माध्यमातून उभारण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी २० नोव्हेंबर या दिवशी महाड येथील पत्रकार परिषदेत केली.

तहसीलदारांनी ७५ लाख रुपयांचा अपहार केल्याची तक्रार

दळणवळण बंदीच्या काळात येथील खानापूर तालुक्यात मार्च २०२० ते मे २०२० पर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. तरीही या काळात पेंडल व्यवस्था, पोलीस बॅरिकेट्स, जेवण, ‘सॅनिटायझर’, ‘मास्क’ आणि इतर कामे यांसाठी ७५ लाख रुपये व्यय दाखवण्यात आला आहे.

चोराडे (जिल्हा सातारा) येथे विनाअनुमती बैलगाडी शर्यतीचे आयोजन !

राज्यात बैलगाडी शर्यतीला अनुमती नसतांना चोराडे (जिल्हा सातारा) गावातील भांडमळा येथील मोकळ्या गायरान जागेत काहीजणांनी विनाअनुमती बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले.

अमली पदार्थ प्रकरणात कलाकार भारती सिंग यांना अटक

हास्य कलाकार भारती सिंग आणि त्यांचे पती हर्ष लिंबाचिया यांना अमली पदार्थ प्रकरणात केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एन्.सी.बी.ने) अटक केली आहे. पोलिसांनी भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरावर धाड टाकली होती.

कार्तिकी एकादशीच्या कालावधीत ३ दिवस श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन बंद रहाणार

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी ‘ऑनलाईन’ पद्धतीने ‘बुकींग’ करून आलेल्या भाविकांना प्रवेश देण्यात येत आहे.

(म्हणे) ‘राजभवनातील मशीद नमाजासाठी उघडा !’ – रझा अकादमी

मुसलमान त्यांची प्रार्थनास्थळे कशी निर्माण करतात, हे लक्षात येईल !

महाराष्ट्रात प्रतिदिन १०५ मुली बेपत्ता होतात ! – राष्ट्रीय गुन्हेगारी विभाग

युवतींना सुरक्षित जीवन जगण्यासाठी रामराज्यासारखे आदर्श असे हिंदु राष्ट्र हवे !

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुणे शहरातील सर्व शाळा तूर्तास बंद

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुणे शहरातील सर्व शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंद .