चोराडे (जिल्हा सातारा) येथे विनाअनुमती बैलगाडी शर्यतीचे आयोजन !

प्रतिकात्मक चित्र

सातारा, २२ नोव्हेंबर (वार्ता.) – राज्यात बैलगाडी शर्यतीला अनुमती नसतांना चोराडे (जिल्हा सातारा) गावातील भांडमळा येथील मोकळ्या गायरान जागेत काहीजणांनी विनाअनुमती बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले. आैंध पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत २ वाहने आणि छकडा असा अनुमाने ५ लाख ७ सहस्र रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला. या प्रकरणी पोलिसांनी ६ जणांना कह्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध शर्यंतबंदी उल्लंघन, प्राणी कायदा आणि कोरोना समूह संसर्ग पसरवण्याचा प्रयत्न करणे अशा विविध कलमांखाली गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.