|
मुंबई – राष्ट्रीय गुन्हेगारी नोंद विभागाने (एन्.सी.बी.) गेल्या मासात दिलेल्या अहवालात वर्ष २०१९ मध्ये प्रतिदिन १०५ मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. त्यांपैकी प्रतिदिन १७ मुलींची तस्करी होत असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. युवती बेपत्ता होणे आणि तस्करी यात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असून त्यानंतर मध्यप्रदेश आणि बंगाल या राज्यांचा क्रमांक आहे.
मुंबईतील गोवंडी परिसरातून ११ मासांत २१ तरुणी बेपत्ता
मुंबईतील गोवंडी परिसरातून गेल्या ११ मासांत २१ तरुणी बेपत्ता झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे ‘बेपत्ता झालेल्या तरुणी जातात कुठे ?’, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या २१ पैकी एक मुलगी अल्पवयीन आहे. गोवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४ मुली २९ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर २०२० या १४ दिवसांमध्ये बेपत्ता झाल्या आहेत, अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर दिली आहे. त्यांनी या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? हे पोलिसांना लक्षात येत नाही का ? – संपादक)