
बेळगाव – दळणवळण बंदीच्या काळात येथील खानापूर तालुक्यात मार्च २०२० ते मे २०२० पर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. तरीही या काळात पेंडल व्यवस्था, पोलीस बॅरिकेट्स, जेवण, ‘सॅनिटायझर’, ‘मास्क’ आणि इतर कामे यांसाठी ७५ लाख रुपये व्यय दाखवण्यात आला आहे. एवढा व्यय करून कोणतेही काम करण्यात आले नाही. त्या कामासाठी कोणतीही निविदा संमत करण्यात आली नाही. खानापूर तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांनी कोरोनाच्या नावाखाली पैशांचा अपहार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते गंगाधर दोडमनी यांनी केला आहे. खोटी कागदपत्रे आणि देयके सादर केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यांना सर्व माहिती ही माहिती अधिकाराच्या अंतर्गत मिळाली आहे. या प्रकरणी त्यांनी एसीबीकडे तक्रार प्रविष्ट केली असून यासंदर्भात पुढील तपास करण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले आहे. (संदर्भ : belgavkar.com)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
सत्र न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाकडून रहित !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
CM Dr. Mohan Yadav : प्रभु श्रीरामचंद्रांनी एक लग्न केले, तर रहिमकडूनही तीच अपेक्षा !
Maharashtra Hostel Scam : बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !