पुस्तकावर संपूर्ण देशात बंदी घालण्याच्या मागणीसाठी राजे प्रतिष्ठान दुर्गसंवर्धन विभागाचेही निवेदन !

गिरीश कुबेर यांच्या पुस्तकावर महाराष्ट्र्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात बंदी घालावी, असे निवेदन कल्याण येथील राजे प्रतिष्ठान दुर्गसंवर्धन विभागाच्या वतीने कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराजे साळवे आणि कल्याणचे तहसीलदार श्री. दीपक आकडे यांना दिले.

तराफा दुर्घटनेप्रकरणी १०० हून अधिक कर्मचार्‍यांचे जबाब नोंदवले !

तौक्ते चक्रीवादळात तराफा बुडाल्याच्या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी १०० हून अधिक कर्मचार्‍यांचे जबाब नोंदवले, तसेच तराफ्याशी संबंधित आस्थापनाच्या कर्मचार्‍यांची चौकशी पोलिसांनी चालू केली आहे.

अमली पदार्थविरोधी पथकाने घरात काम करणार्‍या दोघांना घेतले कह्यात

अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने ३० मे या दिवशी सुशांतसिंह यांच्या घरात काम करणारे केशव आणि नीरज या दोघांना अन्वेषणासाठी कह्यात घेतले आहे.

अमरावती येथे रवींद्र वैद्य यांनी अन्नछत्राद्वारे लाखो लोकांची भूक भागवली !

कोरोनाच्या संकटकाळात शहरातील महादेव खोरी परिसरातील ‘वर्‍हाड’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र वैद्य यांनी पुढाकार घेत अनेकांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे.

शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना दाखला दिल्याप्रकरणी वॉलनट शाळेची चौकशी होणार !

चौकशी करून शाळेला सूचना करण्याच्या आदेशाचे पत्र आयोगाने शिक्षण उपसंचालकांना दिले. शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींचा भंग केल्याने आयोगाने कार्यवाही केली.

सांगली जिल्ह्यात दळणवळण बंदी शिथिल

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने, सार्वजनिक ठिकाणे, उपक्रम, सेवा बंद रहातील, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी निर्गमित केले आहेत.

अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग गतीने होण्यासाठी आमचा प्रयत्न ! – जयंत पाटील, जलसंपदामंत्री

अतीवृष्टी होऊन नद्यांना पूर आला, तर त्याविषयी विशेष काळजी घेतली जाणार आहे. जलसंपदा विभाग आणि महसूल विभाग आतापासून दक्ष आहे. कर्नाटक राज्याच्या आपण संपर्कात आहोत.

आषाढी वारीसाठी नियमांसह अनुमती द्यावी, अन्यथा मंत्रालया समोर आंदोलन करू ! – ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भाविक वारकरी मंडळ

पंढरपूर पोटनिवडणूक घेण्यात आली. निकालानंतरचा विजयोत्सव साजरा करण्यात आला, मग राजकीय कार्यक्रम चालतात, तर वारीला अडचण का ?

हिंदु पोलीस अधिकारी असल्याचे सांगून हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करणार्‍या धर्मांधाला अटक

देशात अशा प्रकारे बनावट मतदान ओळखपत्रे बनवली जातात, हे पोलिसांना आणि प्रशासनाला ठाऊक कसे नाही ? संबंधित उत्तरदायींना देशद्रोहाच्या गुन्ह्यांतर्गत कठोर शिक्षा केली पाहिजे ! – संपादक

हुंड्यासाठी सासरच्या छळाला कंटाळून बारामती येथील विवाहितेची आत्महत्या

विवाहात सोने कमी दिल्याच्या कारणास्तव, तसेच विवाहानंतरही वडिलांकडून ५० तोळे सोने घेऊन येण्याच्या मागणीसाठी पतीकडून होणार्‍या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून विवाहितेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.