स्वामी विवेकानंदांचा आदर्श ठेवून हिंदु धर्माचे महत्त्व पटवून देण्यासाठी कार्य करा ! – ओंकार शुक्ल

गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी जिज्ञासू, धर्मप्रेमी उपस्थित होते.

ऋषीमुनींकडून हिंदु समाजाला अलौकिक ज्ञान; मात्र धर्मशिक्षण नसल्याने हिंदूंची वाताहत ! – प्रसाद कुलकर्णी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी जिज्ञासू, धर्मप्रेमी उपस्थित होते. ग्रंथ प्रदर्शनास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

नाशिक येथे एफ्.डी.ए.च्‍या पडताळणीत आढळलेले ३ सहस्र २० लिटर भेसळयुक्‍त दूध नष्‍ट !

एका वाहनात प्रथमदर्शनी दुधात भेसळ केल्‍याचे उघड झाले. टँकरमधील दुधाचा नमुना विश्‍लेषणासाठी घेऊन उर्वरीत १ लाख १३ सहस्र २५० रुपये किमतीचा ३ सहस्र २० लिटर साठा नाशवंत असल्‍याने जनआरोग्‍याच्‍या हिताच्‍या दृष्‍टीने जागेवरच नष्‍ट करण्‍यात आला

सातारा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात पार पडला !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील श्री शाहू कला मंदिर येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने १५ ऑगस्‍टला प्रत्‍येक जिल्‍ह्यात ‘हिंदवी स्‍वराज्‍य स्‍वातंत्र्यदिन पदयात्रा’ ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

यंदाच्‍या वर्षापासून १५ ऑगस्‍टला श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने झेंडावंदन झाल्‍यावर ‘हिंदवी स्‍वराज्‍य स्‍वातंत्र्यदिन पदयात्रा’ काढण्‍यात येतील, असे प्रतिपादन त्यांनी केले.

महापुरुषांनी शिक्षण घेतलेल्‍या शाळांमध्‍ये महाराष्‍ट्र शासन त्‍यांच्‍या कार्याचे संग्रहालय उभारणार !

राज्‍यातील अशा १३ ऐतिहासिक गावांतील शाळांची शासनाने निवड केली आहे. या शाळांमध्‍ये संबंधित राष्‍ट्रपुरुषांच्‍या कार्याची माहिती सांगणारी संग्रहालये उभारण्‍यात येणार आहेत. यासाठी १४ कोटी ३० लाख रुपयांचा निधी शासनाने घोषित केला आहे.

श्री विठ्ठलभक्‍ती बडव्‍यांकडून शिका अन् श्री विठ्ठलाची अपकीर्ती थांबवा ! – गणेश लंके, अध्‍यक्ष, श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर संरक्षक कृती समिती, पंढरपूर

अफझलखान, तसेच परकीय आक्रमणे यांपासून विठ्ठलमूर्तीचे संरक्षण, पावित्र्य जतन करून ठेवणारे बडवेच होते. विठ्ठलाची तुलना राजकीय व्‍यक्‍तीशी करणे, हे संतापजनक आहे. श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीने निषेध करायला हवा होता.

मुंबईत चुनाभट्टी येथे भीषण अपघात, एकाचा मृत्‍यू !

चुनाभट्टी येथे मुंबई ईस्‍टर्न एक्‍सप्रेस हायवेवरून भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकने ४ वाहनांना धडक दिली. यामध्‍ये एकाचा जागीच मृत्‍यू झाला असून ३ जण गंभीर घायाळ आहेत.

जैन मुनी हत्‍येचे अन्‍वेषण सीबीआयकडे द्या ! – अभय पाटील, आमदार, भाजप

चिक्‍कोडी तालुक्‍यातील हिरेकोडी नंदीपर्वत जैन आश्रमाचे १०८ कामकुमारनंदी महाराज यांच्‍या हत्‍येच्‍या अन्‍वेषणात पोलिसांकडून सत्‍य समोर येत नाही. त्‍यामुळे हे अन्‍वेषण सीबीआयकडे (केंद्रीय अन्‍वेषण यंत्रणा) द्यावे, अशी मागणी बेळगाव दक्षिणचे भाजपचे आमदार अभय पाटील आणि माजी आमदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

पर्यावरणद्रोहींवर कारवाई करण्‍यासाठी ठाकरे पक्षाची वन विभागासमोर निदर्शने!

गांधीनगर बाजारपेठेतील जे लोक दुकानासमोरील वृक्ष कचरा पेटवून नष्‍ट करतात आणि जे लोक आम्‍ल टाकून वृक्ष नष्‍ट करतात, अशा पर्यावरणद्रोही लोकांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच जे वृक्ष सध्‍या डौलाने उभे आहेत, त्‍यांची गणना करून त्‍यावर क्रमांक टाकून त्‍यांच्‍या संवर्धनाचे दायित्‍व निश्‍चित करण्‍यात यावे, या मागणीसाठी ठाकरे पक्षाच्‍या वतीने वन विभागासमोर निदर्शने करण्‍यात आली.