ऋषीमुनींकडून हिंदु समाजाला अलौकिक ज्ञान; मात्र धर्मशिक्षण नसल्याने हिंदूंची वाताहत ! – प्रसाद कुलकर्णी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

मिरज (जिल्हा सांगली) – गुरुपौर्णिमा म्हणजे व्यास पौर्णिमा ही भारताची अलौकिक संपदा आहे. व्यासासह अनेक ऋषींनी हिंदु समाजाला अलौकिक ज्ञान दिले आहे. ख्रिस्ती, इस्लाम, बौद्ध, यहुदी हे पंथ स्थापन होण्यापूर्वीपासून म्हणजे लाखो वर्षांपासून हिंदु धर्म अस्तित्वात आहे; मात्र सद्यस्थितीचा विचार केल्यास हिंदु धर्मापासून हिंदू दूर जात आहे. हिंदु धर्माचे ज्ञान नसल्याने हिंदूंची वाताहत होत आहे. नेपाळ, तिबेट, भुतान, श्रीलंका, पाकिस्तान हे देश भारताचा भाग असल्याने या देशाचा भारतात समावेश करून अखंड हिंदुस्थानासाठी हिंदूंनी शपथ घेतली पाहिजे. हिंदूंची वाताहत संपवण्यासाठी आणि समाजऋण फेडायचे असेल, तर हिंदूंना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रसाद कुलकर्णी यांनी येथे केले.

प्रसाद कुलकर्णी

ते मिरज येथील दत्त मंगल कार्यालय येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात ते बोलत होते. येथे २३७ जिज्ञासू, मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवर – मिरज दासबोध मंडळाचे अध्यक्ष श्री. शामराव साखरे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. माधवराव गाडगीळ, ‘ज्योती गॅस एजन्सी’चे मालक श्री. अरुण सन्मुख, समर्थभक्त श्री. चंद्रशेखर कोडोलीकर, शिरोळ (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘श्री स्वामी समर्थ संप्रदाया’चे अनुयायी आणि उद्योजक श्री. रवींद्र महात्मे (शिरोळ), जयसिंगपूर येथील उद्योजक श्री. प्रसन्ना कुंभोजकर

२. ईश्वरपूर येथील दत्त मंगल कार्यालय येथे झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी श्री दत्त मंगल कार्यालयाचे श्री. सुधीर कुलकर्णी, युवा उद्योजक श्री. दीपक पटेल, ‘श्री धोंडीराम महाराज मंदिरा’चे अध्यक्ष श्री. सुभाष पाटील यांसह २२४ जिज्ञासू, धर्मप्रेमी उपस्थित होते.

पलूस येथील गुरुपौर्णिमा उत्सवात मार्गदर्शन करतांना कु. प्रतिभा तावरे आणि उपस्थित जिज्ञासू, मान्यवर
पलूस येथील गुरुपौर्णिमेसाठी उपस्थित जिज्ञासू, मान्यवर

३. पलूस येथे झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी २२० जिज्ञासू, धर्मप्रेमी उपस्थित होते. येथे ग्रंथ प्रदर्शनास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.