सातारा, ४ जुलै (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील श्री शाहू कला मंदिर येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कालमहिम्यानुसार हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे. त्याला कुणीही रोखू शकत नाही. त्यामुळे काळानुसार आपणही हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्य केले, तर ती आपली काळानुसार साधना होणार आहे.
त्यामुळे उपस्थितांनी काळानुसार हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संकल्प करावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती डाफळे यांनी केले.
गुरुपौर्णिमा सोहळ्यात प्रदर्शन कक्षात विविध ग्रंथांची माहिती जाणून घेतांना, अभिप्राय लिहितांना जिज्ञासू
या महोत्सवाला दशनाम जुना आखाड्याचे पू. सोमनाथगिरी महाराज यांची वंदनीय उपस्थिती लाभली, तसेच अखिल भारतीय हिंदु महासभेचे कार्यकारणी सदस्य श्री. उमेश गांधी, पंचपाळी हौद श्री दुर्गामाता मंदिर ट्रस्टचे विश्वस्त श्री. धनंजय देशमुख, विश्व हिंदु परिषदेचे माजी शहरमंत्री श्री. जितेंद्र वाडेकर, भाजपचे माजी नगरसेवक श्री. विजयकुमार काटवटे, वेदभवन मंगल कार्यालयाचे मालक श्री. दिनेश पाठक आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला ६०० जिज्ञासू उपस्थित होते.
क्षणचित्रे
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कार्यक्रमस्थळी युवतींना स्वरक्षणाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.
बालसंस्कार कक्षावर हिंदु संस्कृतीचे महत्त्व सांगतांना बालसाधक