वाहनांच्‍या विशेष पडताळणी मोहिमेत २६ वाहनांविरुद्ध कारवाई !

समृद्धी महामार्गावर २५ प्रवाशांचे बळी घेणार्‍या ट्रॅव्‍हल्‍सच्‍या अपघातानंतर ९ जुलैच्‍या रात्री त्‍या महामार्गासह अन्‍य ३ मार्गांवर वाहनांची विशेष पडताळणी मोहीम राबवण्‍यात आली.

रहाटणी (जि. पुणे) येथे धर्मांतर करण्‍यासाठी महिलेवर दबाव !

‘बायबल वाचा’, ‘येशू ख्रिस्‍त्‍यांवर विश्‍वास ठेवा’, असे सांगत पिंपरी-चिंचवडमधील रहाटणी येथील एका महिलेचे धर्मांतरासाठी मनपरिवर्तन करण्‍याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी ३९ वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्‍यात तक्रार प्रविष्‍ट केली आहे.

संत तुकोबारायांच्‍या पालखीचे चौफुला, वाखारी येथे स्‍वागत !

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्‍याचे परतीच्‍या मार्गावरील दौंड तालुक्‍यात चौफुला वाखारी येथे भक्‍तिमय वातावरणात आगमन झाले. रांगोळी आणि फुलांच्‍या पायघड्या घालून पालखी सोहळ्‍याचे स्‍वागत करण्‍यात आले.

शिवसैनिकांच्‍या मेळाव्‍यासाठी १४ जुलैला मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे कोल्‍हापूर दौर्‍यावर ! – राजेश क्षीरसागर

एका मासात मुख्‍यमंत्र्यांचा दुसरा दौरा असल्‍याने शिवसैनिकांमध्‍ये उत्‍साहाचे वातावरण आहे, अशी माहिती राज्‍य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्‍यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. या मेळाव्‍याच्‍या नियोजनासाठी १२ जुलैला सकाळी ११ वाजता दसरा चौक येथील राजर्षी शाहू स्‍मारक भवन येथे पदाधिकार्‍यांच्‍या मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले आहे.

‘थूक जिहाद’चे आणखी एक प्रकरण उजेडात !

चंडीगडमधील एका धाब्‍यावर स्‍वयंपाक करणारा मोहम्‍मद आदिल रोट्या बनवतांना त्‍यांवर थुंकत असल्‍याचा एक व्‍हिडिओ सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित झाला आहे. त्‍यानंतर चंडीगड पोलिसांकडून हा ढाबा बंद करण्‍यात आल्‍याचे वृत्त आहे.

वडगाव (पुणे) येथे चॉकलेटचे आमीष दाखवून धर्मांधांचा अल्‍पवयीन मुलीवर बलात्‍कार !

आरोपीने अल्‍पवयीन मुलीला चॉकलेट देण्‍याचे आमीष दाखवून तिला भंगाराच्‍या दुकानात नेऊन तिच्‍याशी बळजोरीने शारीरिक संबंध केले आणि तिला जिवे मारण्‍याची धमकी दिली. 
या प्रकरणी पीडित मुलीच्‍या आईने वडगाव पोलीस ठाण्‍यात तक्रार दिली आहे.

प्रदीप कुरुलकर यांनी २ महिलांचे लैंगिक शोषण केल्‍याचे ए.टी.एस्.च्‍या अन्‍वेषणात उघडकीस !

पाकिस्‍तानला गोपनीय माहिती दिल्‍याचा आरोप असलेले डी.आर्.डी.ओ.चे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी डी.आर्.डी.ओ.तील कामाची कंत्राटे देतांना २ महिलांचे लैंगिक शोषण केल्‍याचे समोर आले आहे.

विधान परिषदेच्‍या १२ सदस्‍यांच्‍या नियुक्‍तीवरील स्‍थगिती सर्वोच्‍च न्‍यायालयाने उठवली !

महाराष्‍ट्राच्‍या विधान परिषदेच्‍या १२ सदस्‍यांच्‍या नियुक्‍तीवरील स्‍थगिती सर्वोच्‍च न्‍यायालयाने उठवली आहे. ११ जुलै या दिवशी न्‍यायमूर्ती चंद्रचूड यांच्‍या खंडपिठापुढे याविषयीची सुनावणी झाली. 

लांजा येथे गोवंशियांची अनधिकृत खरेदी-विक्री करणार्‍या तिघा जणांना पोलिसांकडून केवळ समज !

समज देऊन गुन्हेगारांचे वर्तन सुधारण्याइतका पोलिसांचा धाक राहिला आहे का ? अशी समज दिल्यानंतर धर्मांध पुन्हा गुन्हा करणार नाहीत, याची पोलिसांना तरी निश्चिती आहे का ?  

‘प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्ट’संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी केंद्रशासनाला ३१ ऑक्टोबरपर्यंत वेळ !

आमच्यासमोर कायद्याला आव्हान देणारी याचिका असून सरकारला यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करायचे आहे. विषयाचे गांभीर्य पहाता आम्हाला यावर आणखी वेळ हवा आहे- तुषार मेहता