लांजा येथे गोवंशियांची अनधिकृत खरेदी-विक्री करणार्‍या तिघा जणांना पोलिसांकडून केवळ समज !

बजरंग दल कार्यकर्त्यांच्या सतकर्तेमुळे प्रकार उघड

(प्रतिकात्मक चित्र)

लांजा – ९ जुलै या दिवशी तालुक्यातील आजगे गावातील फापेवाडी येथील अब्बास (आबा) पाटणकर नावाच्या धर्मांध दलालाने बेनी गावातील गणेश लांबोरे यांच्याकडे गाय विक्री करण्यासाठी आणली होती. ही गाय अब्बासने आजगे येथील विजय पवार यांच्याकडून विकत घेतली होती. हा प्रकार लक्षात येताच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी लांजा पोलीस ठाणे, तसेच शांतता समितीला ही माहिती कळवली. त्यानंतर लांजा पोलीस ठाण्यामधून संबंधितांना कडक शब्दांत समज देण्यात येऊन त्यांच्याकडून ‘यापुढे गोवंशांची खरेदी-विक्रीचे गैरकृत्य करणार नाही’, असे वदवून घेण्यात आले.

 

अब्बास पाटणकर हा धर्मांध ‘आबा’ हे नाव धारण करून स्वत: हिंदु आहोत, असे लोकांना भासवतो आणि गोवंशियांची खरेदी विक्रीचा व्यवहार करत असतो. असे प्रकार या अगोदरही उघड झाले होते. या प्रकाराची माहिती मिळताच बजरंग दलाचे कार्यकर्ते बेनी येथील गणेश लांबोरे यांच्या घरी गेले आणि त्यांनी अब्बासला जाब विचारल्यावर प्रथम अब्बासने ‘गाय गाभण आहे; म्हणून मी घेऊन आलो’, असे उत्तर दिले. त्यानंतर गाय ‘गणेश लांबोरे यांना विकायला आलो आहे’, असेही विधान केले. अब्बास याच्या बोलण्यात विसंगती आढळल्यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी लांजा पोलीस ठाणे, तसेच लांजा गावातील शांतता समितीला ही माहिती दिली. त्यानंतर गाय खरेदी-विक्रीच्या प्रकणात गुंतलेले अब्बास, गणेश लांबोरे आणि विजय पवार यांना लांजा पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. तेथे पोलिसांनी त्यांना कडक शब्दांत समज दिली, तसेच विजय पवार यांना त्यांची गाय विक्री न करण्याच्या बोलीवर परत करण्यात आली.

धर्मांध अब्बासकडून अद्यापही गोवंशियांची अनधिकृत खरेदी-विक्री चालूच !

मे २०२३ मध्ये लांजा येथील एका हिंदु मालकाने त्याची गाय अब्बास या दलालाला दीड सहस्र रुपयांना विकली होती. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना ही गोष्ट समजताच त्यांनी हिंदु मालकाचे प्रबोधन करून याच अब्बासकडून गायीची सुटका करून आणली होती. 

संपादकीय भूमिका

अशी समज देऊन गुन्हेगारांचे वर्तन सुधारण्याइतका पोलिसांचा धाक राहिला आहे का ? अशी समज दिल्यानंतर धर्मांध पुन्हा गुन्हा करणार नाहीत, याची पोलिसांना तरी निश्चिती आहे का ?