‘थूक जिहाद’चे आणखी एक प्रकरण उजेडात !

मोहम्‍मद आदिल रोट्यांवर थुंकतांनाचा व्‍हिडिओ प्रसारित : चंडीगड पोलिसांनी केला ढाबा बंद !

चंडीगड – चंडीगडमधील एका धाब्‍यावर स्‍वयंपाक करणारा मोहम्‍मद आदिल रोट्या बनवतांना त्‍यांवर थुंकत असल्‍याचा एक व्‍हिडिओ सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित झाला आहे. त्‍यानंतर चंडीगड पोलिसांकडून हा ढाबा बंद करण्‍यात आल्‍याचे वृत्त आहे. या व्‍हिडिओमध्‍ये स्‍वयंपाक करणारी व्‍यक्‍ती रोट्यांना हाताने आकार दिल्‍यानंतर त्‍या तोंडात घेतांना दिसत आहे.

‘दिल्ली दरबार’ नावाच्‍या या ढाब्‍याच्‍या मालकाचे नाव मोहम्‍मद अकील आहे. अन्‍नावर थुंकण्‍याच्‍या प्रश्‍नावर ढाब्‍याच्‍या मालकाने सांगितले की, ते थुंकणे नसून फुंकणे आहे. याविषयीचा व्‍हिडिओ प्रसारित झाल्‍यानंतर संतप्‍त लोकांचा जमाव आपल्‍या ढाब्‍यावर आला आणि त्‍यांनी ढाबा बंद पाडला, असे अकील याने सांगितले.

मलोया पोलीस ठाण्‍याचे निरीक्षक जसपाल सिंह यांनी सांगितले की, कायदा आणि सुव्‍यवस्‍था राखण्‍यासाठी सध्‍या ढाबा बंद ठेवण्‍यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्‍वेषण करत आहेत.