मद्यधुंद चारचाकी चालकाने तिघांना दिली धडक

या अपघातात अमित यादव (वय २५ वर्षे) या कामगाराचा मृत्यू झाला, तर अभयराय निर्मल आणि धीरज शर्मा हे कामगार गंभीररित्या घायाळ झाले आहेत.

अतिक्रमण हटवा आणि भूमीचे उत्खनन करून ऐतिहासिक वारसा जनतेसमोर आणा ! – हिंदू रक्षा महाआघाडी, गोवा

हिंदूंना अशी मागणी का करावी लागते ? पुरातत्व खाते स्वतःहून सत्य जनतेसमोर का आणत नाही ?

शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णाला कालावधी संपलेले सलाईन लावले !

शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात बुधवार, २१ ऑगस्ट या दिवशी भरती झालेल्या एका युवतीला वापरण्याचा कालावधी (एक्सपायरी डेट) संपलेले सलाईन लावण्यात आले. त्यानंतर युवतीला त्रास होऊ लागला.

पेडणे तालुक्यातील टॅक्सी व्यावसायिकांचे त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन

देहली दौर्‍यावर असलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याविषयी प्रसारमाध्यमांना म्हणाले, ‘‘टॅक्सी व्यावसायिक अकारण आंदोलन करत आहेत. वास्तविक टॅक्सी व्यावसायिकांसाठी मोपा विमानतळावरील शुल्क २०० रुपयांवरून ८० रुपये केले आहे.’’

बदलापूर येथे आक्षेपार्ह विधानाप्रकरणी वामन म्हात्रे यांच्यावर गुन्हा नोंद !

शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या विरोधात विनयभंग आणि ॲट्रॉसिटी यांचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. म्हात्रे यांच्यावर कारवाई करावी, ही मागणी विरोधकांनी लावून धरली होती.

पिंपरीतील ३ रुग्णालयांमध्ये बाँब ठेवल्याचा फसवा ई-मेल !

पथकाला रुग्णालय परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. तो ई-मेल फसवा असल्याचे लक्षात आले.

पार्श्वभूमी न पडताळता शाळेतील कामावर संबंधितांना कसे नेमता ? – सुशीबेन शहा, अध्यक्षा, राज्य बाल हक्क आयोग

जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या अंगावर शाळेचा गणवेश आहे, तोपर्यंत त्यांचे दायित्व शाळेचे असते, असे प्रतिपादन राज्य बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांनी केले.

मुंबईत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून पळणार्‍या जुबेर शाह याला नागरिकांनी पकडले !

नागपाडा येथे रस्त्यावर कर्णफुले आणि बांगड्या विकणार्‍या जुबेर शाह (वय ४५ वर्षे) याने त्याच्याकडील साहित्य पहाण्यासाठी उभ्या असलेल्या ८ वर्षीय मुलीचा विनयभंग केला.

इक्बालसिंह चहल यांची गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवपदी नियुक्ती 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहविभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून कार्यभार सांभाळतील, तसेच खनिकर्म विभागाचा अतिरिक्त कार्यभारही चहल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

२४ ऑगस्ट या दिवशी महाविकास आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा

महिला आणि युवती यांच्यावरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ नागरिकांनी या राज्यव्यापी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आले आहे.