देशात गेल्या ३ वर्षांत सायबर गुन्ह्यांमध्ये जवळपास तिपटीने वाढ ! – संसदीय समितीचा अहवाल

ही आहे माहिती आणि तंत्रज्ञानाची दुसरी समाजघातकी बाजू ! एरव्ही आधुनिकतेचा डंका पिटणार्‍या प्रशासनाला सायबर गुन्ह्यांचा छडा लावणारी प्रभावी यंत्रणा अद्याप निर्माण न करता येणे लज्जास्पद !

सर्वोच्च न्यायालयापासून कनिष्ठ न्यायालयांपर्यंत एकूण तब्बल ५ कोटी खटले प्रलंबित ! – अर्जुनराम मेघवाल, केंद्रीय कायदामंत्री 

गेल्या अनेक दशकांत सर्वपक्षीय सरकारे आली आणि गेली ! ‘या भयावह समस्येवर कायमस्वरूपी तोडगा न काढता प्रत्येक संसदीय अधिवेशनात केवळ प्रलंबित खटल्यांचा वाढता आकडा सांगून काय उपयोग ?’, असे कुणा राष्ट्रभक्ताला वाटल्यास चूक ते काय ?

मणीपूरमध्ये सुरक्षा दलाशी चकमक : ५ आक्रमणकर्ते ठार

मणीपूरमध्ये गेल्या २४ घंट्यांत विष्णुपूर आणि चुराचांदपूर जिल्ह्यांमध्ये हिंसाचार करणार्‍यांनी सुरक्षादलांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. या वेळी दोघांमध्ये चकमक झाली. हिंसाचार करणार्‍यांनी २०० गावठी बाँब आणि ड्रोन यांचा  वापर केला.

मणीपूरमधील हिंसाचारामध्ये परकीय शक्तींचा हात असण्याची शक्यता ! – मनोज नरवणे, माजी सैन्यदल प्रमुख

मणीपूरमधील सगळ्या घटनांमध्ये परकीय शक्तींचा हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मी तर असे म्हणेन की, त्यांचा तेथे वावर आहेच. विशेषत: चीन गेल्या अनेक वर्षांपासून कट्टर गटांना साहाय्य करत आला आहे, असे विधान माजी सैन्यदल प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी केले.

बरेली (उत्तरप्रदेश) येथे फरजना हिने हिंदु धर्म स्वीकारून हिंदु प्रियकराशी केला विवाह !

शेकडो हिंदु मुली लव्हा जिहादला बळी पडतात; मात्र हिंदु पालक कधीही अशा प्रकारची धमकी देत नाहीत; मात्र एखाद्या घटनेत मुसलमान तरुणी हिंदु प्रियकरासाठी धर्म पालटते, तर मुसलमान लगेचच ठार मारण्याची धमकी देतात आणि काही वेळेत तशी कृतीही करतात, याविषयी निधर्मीवादी तोंड उघडतील का ?

भगवान श्रीरामांविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह  टीपणी करणार्‍या नईम याला अटक

महंमद पैगंबर यांचा कुणी अवमान केला असतात, तर मुसलमानांनी त्याचा शिरच्छेद करण्याची घोषणा केली असती; मात्र हिंदू कायद्यानुसार वागणारे असल्याने ते कधी अशा घोषणा देत नाहीत, हे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी लक्षात घेतील का ?

गोवा : अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ करणारी टोळी गजाआड

शयितांमधील प्रणीत लोलयेकर व्यतिरिक्त अन्य परप्रांतीय आहेत. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार साहित्य (‘सी.एस्.ए.एम्.’ – Child Sexual Abuse Material) कायद्याचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी ही कारवाई केली.

सिंधुदुर्ग : तांबळेश्‍वर येथील श्री भगवती मंदिरात चोरी !

हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! चोरांना कायदा-सुव्यवस्थेचा कोणताही धाक नसल्याचे दर्शवणारी घटना ! 

बहुसंख्यांकांच्या भावना दुखावतील असे विधान करू नये ! – पुरातत्व विभागाचे मंत्री सुभाष फळदेसाई, गोवा

असे पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी ‘आप’चे आमदार क्रूझ सिल्वा यांना सुनावले. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती का साजरी करावी ?’, असा प्रश्‍न ‘आप’चे आमदार क्रूझ सिल्वा यांनी विचारला होता.

म्हादई अभयारण्य आणि मोले राष्ट्रीय उद्यान येथे ५ वर्षांत ३८ वेळा वाघांचे दर्शन

व्याघ्र प्रकल्पावरून राज्यात गदारोळ माजलेला असतांनाच गेल्या ५ वर्षांत म्हादई अभयारण्य आणि मोले राष्ट्रीय उद्यान येथे वन खात्याने लावलेल्या कॅमेर्‍यांमध्ये ३८ वेळा वाघांचे दर्शन झाल्याची माहिती समोर आली आहे.