मणीपूरमधील हिंसाचारामध्ये परकीय शक्तींचा हात असण्याची शक्यता ! – मनोज नरवणे, माजी सैन्यदल प्रमुख

माजी सैन्यदल प्रमुख मनोज नरवणे यांचे विधान !

मनोज नरवणे

नवी देहली – मणीपूरमधील सगळ्या घटनांमध्ये परकीय शक्तींचा हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मी तर असे म्हणेन की, त्यांचा तेथे वावर आहेच. विशेषत: चीन गेल्या अनेक वर्षांपासून कट्टर गटांना साहाय्य करत आला आहे, असे विधान माजी सैन्यदल प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी केले. येथील ‘इंडियन इंटरनॅशनल सेंटर’मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय सुरक्षितता दृष्टीकोन’ या विषयावरील संवादाच्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

१. नरवणे पुढे म्हणाले की, अशा काही संघटना किंवा शक्ती असू शकतात, ज्यांना मणीपूरमधील हिंसाचारातून लाभ होणार आहे. त्यांना ‘मणीपूरमधील परिस्थिती सामान्य होऊ नये’, असेच वाटत आहे. तेथे जेवढी अशांतता असेल, तेवढा त्यांचा लाभ होईल. त्यामुळेच कदाचित् एवढे प्रयत्न करूनही मणीपूरमध्ये शांतता प्रस्थापित होत नाही.

२. ‘सध्या अधिकारपदावर बसलेले आणि या सर्व घडामोडींमध्ये निर्णय घेणारे त्यांच्या परीने सर्वोत्तम काम करत आहेत, असा मला विश्‍वास आहे’, असेही मनोज नरवणे यांनी या वेळी स्पष्ट केले.